01:39pm | Sep 15, 2021 |
सातारा : भारतातील नव्हे तर जगातील सर्वात निकृष्ठ दर्जाचा महामार्ग असलेला सातारा-पुणे अशियाई महामार्ग कोल्हापूरपासून पुणे जिल्ह्यातील लोकांना गेली दोन दशके डोकेदुखी ठरलेला आहे. निकृष्ठ दर्जाच्या कामामुळे या महामार्गावर दरवर्षी शेकडो अपघात होतात. आतापर्यंत शेकडोजण या महामार्गावर झालेल्या अपघातांमध्ये प्राणास मुकले, तर अनेकांना कायमचे जायबंदी व्हावे लागले आहे. असे असूनही टोल चा झोल सातारकरांच्या मानगुटीवर बसलेला आहे. आज जागतिक अभियंता दिन आहे. असे असताना ‘सातारा-पुणे अशियाई महामार्गाच्या अभियंत्यांना सोडून सर्वांना शुभेच्छा!’, अशा विनोदी आशयाचे मिम्स सोशल मीडियावर व्हायरल होत असले तरी अनेकांच्या मनात असलेली चीड या माध्यमातून बाहेर पडत आहे.
सुमारे दोन दशकांपूर्वी पुणे-बंगलुरु महामार्गाच्या विस्तारीकरणाचे काम हाती घेण्यात आले होते. शेंद्रे ते बेळगावपर्यंत महामार्ग विस्तारीकरणाचे काम अगदी चोख झाले. रस्त्याच्या दुतर्फा सेवारस्ते, रस्त्याच्या मधोमध असलेल्या दुभाजकांमध्ये शोभेची झाडे, यामुळे शेंद्रे ते बेळगावपर्यंत प्रवास करताना प्रवाशांना एक सुखद प्रवास केल्याची अनुभूती मिळत असते. त्यामुळे तासवडे-किणी-कागल याठिकाणी असलेल्या टोल वर खिशातील पैसे देताना वाहनधारकांना पश्चाताप होत नाही. मात्र याउलट परिस्थिती सातारा-पुणे या 110 कि.मी. ची आहे. हे काम दिवंगत उद्योगपती धीरुबाई अंबानी यांच्या दिवट्याने घेतले होते. स्थापत्य कलेचा कोणताही अनुभव नसताना रिलायन्स ने सातारा ते पुणे या महामार्गाच्या विस्तारीकरणाचे टेंडर घुसवले होते. यामध्ये खंबाटकी घाटातील दोन्ही बोगद्यांचा समावेश होता. मात्र, वास्तवात साताराकडून पुणेकडे जाताना एकच बोगद्याची निर्मिती करण्यात आली. मात्र, पुणे बाजूकडून सातार्याकडे येताना खंबाटकीच्या जुन्याच घाटाची थोडीबहुत डागडुजी करुन त्याठिकाणावरुन वाहतूक सुरु करण्यात आली.
यापूर्वी सातारा-पुणे दरम्यान तीन टोल होते. पैकी खंडाळा येथील खंबाटकी घाटाच्या पुढ्यातील टोलनाका मोठ्या आंदोलन व संघर्षानंतर बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, आनेवाडी तसेच खेड शिवापूर येथील टोल नाके सुरुच असून या टोलच्या माध्यमातून रिलायन्सची पठाणी वसुली सुरुच आहे.
पुणे-सातारा या महामार्गाच्या सहापदरीकरणाचे काम सुरु झाल्यानंतर लोकांना वाटले, रस्त्याचे रुंदीकरण झाल्यानंतर सातारा-पुणे प्रवास सुखद होईल, परंतू कसले काय? पुढले पाठ, मागचे सपाट यानुसार रिलायन्सने जेवढे ओढता येईल तेवढे ओढले. सहापदरीकरणानंतरही रस्त्यावर मोठमोठ्ठाल्ले खड्डे, उड्डाणपुलांची ठिकठिकाणी सुरु असणारी अपूर्ण कामे, सेवारस्त्यांचा बोजवारा यामुळे गेल्या सात-आठ वर्षात हा महामार्ग म्हणावा, की खेड्यातला रस्ता? असे अनेक नवख्या प्रवाशांना वाटायचे आणि वाटतही आहे. परंतू या महामार्गावरुन प्रवास करणारे सोशिक असल्याने कोणालाही रिलायन्सच्या विरोधात जनआंदोलन करण्याचे महत्त्वाचे वाटले नाही. वर्षापूर्वी आनेवाडी टोलनाक्यावर आंदोलनाचा फार्स करण्यात आला. परंतू ते आंदोलनही हवेत विरुन गेले.
टोल घेताय तर किमान चांगले रस्ते तरी करा, अशा आशयाची कोल्हेकुई नेहमीच अनेकजण सोशल मीडियावर करीत असतात. परंतू सोशल मीडियावरील वळवळ प्रत्यक्षात चळवळ बनत नाही, हेच खरे दुखणे आहे. आज आंतरराष्ट्रीय अभियंता दिन आहे. या दिनानिमित्त स्थापत्य क्षेत्रात कार्यरत असणार्या अनेक अभियंत्यांना शुभेच्छा दिल्या व घेतल्या जात आहेत. मात्र, गेली दोन दशके सातारा-पुणे दरम्यान असणार्या अशियाई महामार्गाची दुरवस्था पाहता या महामार्गाचे काम खरेच अभियंत्यांनी केले आहे की, रस्त्यावरील मैल कुलींनी? हे न उलगडणारे कोडे आहे. त्यामुळे अभियंता दिनी अनेकांनी सातारा-पुणे अशियाई महामार्गाच्या अभियंत्यांना सोडून सर्वांना या दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यानिमित्ताने या शुभेच्छा गमतीशीर वाटत असल्या तरी अनेकांनी या माध्यमातून आपला राग व त्रागा व्यक्त केला आहे.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |