10:24pm | Sep 16, 2020 |
सातारा : महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या राजकारणात गेली पन्नास वर्ष कार्यरत असणाऱ्या शरद पवार यांना आजच मराठा आरक्षण प्रश्न महत्त्वाचा वाटू लागला आहे. संपूर्ण राजकीय कारकिर्दीत यापूर्वी कधीही मराठा आरक्षण प्रकरणी ठोस भूमिका न घेणाऱ्या शरद पवार यांना मराठा समाज आरक्षणाचा अचानक साक्षात्कार कसा झाला? हा चिंतनाचा विषय आहे, अशी टीका खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांनी राष्ट्रवादी सुप्रीमो शरद पवार यांच्यावर केली.
मराठा समाज आरक्षण प्रश्न लोकसभेत मांडल्यानंतर एका वृत्तवाहिनीशी बोलताना खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर म्हणाले की, शरद पवार यांनी आजवरच्या संपूर्ण राजकीय प्रवासात कधीही मराठा समाजाच्या प्रश्नांबाबत ठोस भूमिका घेतली नाही. कधी भूमिका घेतलीच तर ती भूमिका कायम बदलत राहिले. आज सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाली आहे. या पाठीमागे विद्यमान सरकारची अनास्था कारणीभूत असून या अपयशाचे खापर मागील सरकारवर फोडण्याचे काम सुरू आहे.
विद्यमान महाविकास आघाडी सरकारला माजी मुख्यमंत्री व विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत वारंवार सूचना देऊनही मराठा आरक्षण प्रश्नाकडे विद्यमान सरकारने पूर्णपणे दुर्लक्ष केले. देशात जवळपास 27 राज्यात 50 टक्क्यांची आरक्षण मर्यादा ओलांडली गेली आहे. ही मर्यादा जवळपास 65 टक्क्यांपर्यंत पोहोचली असतानाही फक्त महाराष्ट्रातच मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे. याचा अर्थ विद्यमान सरकार सुप्रीम कोर्टात
मराठा आरक्षण प्रश्नी भूमिका मांडण्यात अपयशी ठरले आहे. हे सत्य नाकारता येणार नाही.
दरम्यान आजही 60 ते 65 टक्के मराठा समाज आर्थिक संकटात आहे. मराठा समाजाला शिक्षणात व नोकरीत आरक्षणाची गरज आहे, हे वास्तव लक्षात आल्यानेच देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला आरक्षण जाहीर केले होते. गेली पन्नास वर्ष राजकारणात असलेल्यांना याप्रश्नी कधीही ठोस भूमिका घ्यायला जमली नाही तेच आज देवेंद्र फडणवीस यांच्यावर अपयशाचे खापर फोडत असल्याचेही खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी म्हटले आहे.
सर्वात महत्वाची म्हणजे महा विकास आघाडीतील विद्यमान मराठा समाजातील नेत्यांना मराठा आरक्षण नको असल्याने सुप्रीम कोर्टात हे आरक्षण प्रभावीपणे मांडले गेले नसल्याचीही टीका खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केली आहे.
निर्भिड आणि स्पष्टवक्ते खासदार उदयनराजे यांनी मराठा समाजाचे नेतृत्व करावे
मराठा आरक्षण प्रश्न सुरुवातीपासूनच निर्भीडपणे स्पष्ट भूमिका घेऊन मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे अशी मागणी करणाऱ्या खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी मराठा समाजाचे नेतृत्व करावे अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. एकीकडे शरद पवार यांचा उल्लेख स्पष्ट भूमिका न घेणारा नेता तर दुसरीकडे स्पष्ट भूमिका घेणारा नेता म्हणून खासदार उदयनराजे भोसले यांचा उल्लेख करून खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी शरद पवार यांच्या मराठा आरक्षणाच्या भूमिकेबद्दल शंका व्यक्त केली आहे.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |