08:43pm | Nov 27, 2020 |
सातारा : गोगावलेवाडी, ता. सातारा येथील घराच्या पाठीमागे असलेल्या माळावर तू इथे शौचास का बसला, असे म्हणाल्याचा राग मनात धरून पती, पत्नी व मुलाला चार ते पाच जणांनी काठी, लोखंडी गज याने बेदम मारहाण केल्याची घटना आज सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत सौ. शोभा शैलेंद्र सावंत (वय ३८) यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
शोभा सावंत यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, आज दि. २७ रोजी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास गोगावलेवाडी, ता. सातारा येथे मी माझ्या पतीसमवेत आमच्या घराशेजारील मोकळ्या रानात गायी सोडून चारण्याकरता निघाले असता थोड्याच अंतरावर त्यात गावातील तेजस यशवंत ओंबळे हा उघड्यावर शौचास बसलेला दिसला. त्यामुळे माझे पती शैलेंद्र सावंत यांनी त्यास तू इकडे माझ्या घराजवळ उघड्यावर शौचास का बसलास असे विचारले असता तेजस ओंबळे हा माझ्या पतीशी भांडणे व शिवीगाळ करू लागला. शेजारी पडलेली काचेची फुटकी बाटली हातात घेऊन तो पतीच्या अंगावर धावून आला. त्यावेळी मी मोठ मोठ्याने ओरडले असता तो हातातील बाटली टाकून त्याच्या घराकडे निघून गेला. त्यानंतर लगेचच तेजस यशवंत ओंबळे त्याचे वडील व त्याचा मित्र विशाल अजित आटोळे व इतर चार ते पाच जणांनी शेडच्या पाठीमागील बाजूकडून लोखंडी गज व काठी घेऊन जोरजोराने शिवीगाळ करत माझे पती शैलेंद्र हे गायी चारत असलेल्या ठिकाणी पळत गेले. त्यांनी हातातील गजाने माझ्या पतींना मारहाण करू लागल्यानंतर अन्य साथीदारांनीही पती शैलेंद्र यांना काठ्या व दांडक्याने मारहाण केली. मी व माझा मुलगा वेदांत भांडणे सोडवत असताना त्यांनी आम्हालाही मारहाण केली म्हणून मी मोबाईलमध्ये भांडणाचे शूटिंग करू लागल्यामुळे तेजस ओंबळे हा माझ्याकडे शिव्या देत परत आला व माझ्या हातातील मोबाईल हिसकावून लागला. या वेळी झालेल्या झटापटीत माझ्या गळ्यातील मनी मंगळसूत्र तुटून पडले. पती शैलेंद्र सावंत मी व माझ्या मुलाला मारहाण शिवीगाळ, दमदाटी केल्याची तक्रार शोभा शैलेंद्र सावंत यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |