07:50pm | Jun 23, 2022 |
पुसेगाव : शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे पालकत्व स्वीकारून त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या जडण -घडणीसाठी ज्ञानाबरोबरच सातत्याने सुसंस्काराचे धडे दिले पाहिजेत, असे प्रतिपादन प्रा. श्रीधर साळुंखे यांनी केले.
सातारा जिल्हा हिंदी अध्यापक मंडळाच्या वतीने संभाजीनगर, सातारा येथील राष्ट्रभाषा भवनाच्या मुख्य सभागृहात गौरवशाली कार्य व पदोन्नती प्रीत्यर्थ आयोजित सत्कार समारंभाच्या अध्यक्षपदावरून ते बोलत होते. साळुंखे पुढे म्हणाले, दोन वर्षानंतर शाळा सुरु झाल्यात. आता विद्यार्थ्यांना मोबाईलच्या अनावश्यक वापरापासून दूर करायला हवे. शिक्षकांनी नंद-यशोदा बनून आईच्या मायेने व वडिलांच्या शिस्तीने विद्यार्थी घडवावेत. कार्यक्रमात मुख्य पाहुणे म्हणून प्राथमिक विभागाचे उपशिक्षणाधिकारी धनजंय चोपडे व माध्यमिक विभागाचे उपशिक्षणाधिकारी तेजस गमरे उपस्थित होते.
प्रारंभी मान्यवरांचे हस्ते सरस्वती पूजन व दीपप्रज्वलन संपन्न झाले. ईशस्तवन व स्वागत गीत सौ. गायत्री पवार व सुषमा माने यांनी सादर केले. मंडळाचे अध्यक्ष ता.का. सूर्यवंशी यांनी आपल्या प्रास्ताविकात राष्ट्रभाषा भवनमध्ये कार्यरत सात संस्थांच्या कार्याची माहिती दिली व गौरव समारंभाची भूमिका विशद केली.
सूर्यवंशी व शाहनवाज मुजावर यांनी मान्यवरांचे स्वागत केले. मालगाव विद्यालयाचे हिंदी शिक्षक मोहन घोरपडे यांनी हिंदीसाठी केलेल्या उत्कृष्ठ कार्याबद्दल त्यांच्या सेवानिवृत्तीचे औचित्य साधून शाल,श्रीफल ,पोशाख व सम्मानपत्र देऊन त्याना सपत्निक गौरविण्यात आले. तसेच अंकुश वाठारकर- अहिरे, गोविंद डोईफोडे- कुरोली, सौ. छाया कदम- सातारा, दिनकर माथने - मोरगिरी , मोहन भिसे- बरड व प्रकाश शिंदे- अंबवडे येथे या हिंदी शिक्षकांना मुख्याध्यापक पदी बढती मिळाल्याबद्दल सपत्निक /पतिसहित गौरविण्यात आले. राज्य स्तरीय खो-खो पंच परीक्षापात्र जुबेर बोरगावकर यांचाही शाल,श्रीफल देऊन सत्कार करणेत आला.
याप्रसंगी उपशिक्षणाधिकारी धनंजय चोपडे यांनी विद्यार्थ्यांचे कलागुण ओळखून त्यांच्या प्रतिभेला योग्य वाव शिक्षकांनी दिला पाहिजे अशी आग्रही भूमिका मांडली. तेजस गमरे यांनी शालेय जीवनात मंडळाच्या विभिन्न उपक्रमात दिलेल्या सहभागाची माहिती दिली व मंडळाच्या कार्याची प्रशंसा करुन शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमात पितृदिनाबद्दलची आजची भूमिका सुषमा माने यांनी मांडली. या निमित्त प्राधिनिधीक स्वरूपात ता. का. सूर्यवंशी यांचा सम्मान करणेत आला. पितृतुल्य सूर्यवंशी यांनी उपस्थितांना पितृदिनाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमादरम्यान महाराष्ट्र राज्य हिंदी शिक्षक महामंडळाचे मुखपत्र- महाराष्ट्र हिंदी अध्यापक मित्र- त्रैमासिक पत्रिकेचे मान्यवरांचे हस्ते प्रकाशन करणेत आले.
कार्यक्रमास परीक्षा मंत्री शिवाजीराव खामकर, चेअरमन हणमंत सूर्यवंशी, कोषाध्यक्ष सुधाकर माने, सचिव मारुती शिवदास, राष्ट्रभाषा भवनातील सर्व आठ संस्थांचे पदाधिकारी, तालुकाध्यक्ष यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार पलटी होवून चालकाचा मृत्यू |
दुचाकीची पादचाऱ्याला धडक |
विद्यानगर येथील कॅफेवर पोलिसांचा छापा |
बेकायदेशीररित्या पिस्तुल बाळगणाऱ्या इसमाला अटक |
खंडणीबहाद्दर १५ आरोपी जेरबंद |
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 24 वा वर्धापन दिन जिल्हा राष्ट्रवादी कार्यालयात संपन्न |
आनेवाडी टोलनाक्यावर वारकऱ्यांची वाहने रोखली |
रंगकर्मींच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध : अभिनेते प्रशांत दामले |
महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी टॅक्स प्रॅक्टिशनर्स सेलच्यावतीने वर्धापनदिनी पत्रकारांच्या कार्याचा गौरव |
पवारांनी धमकावणाऱ्यांना सुनावलं, 'मी धमकीची चिंता करीत नाही किंवा अशा धमक्यांना घाबरत नाही' |
ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यामुळं वाहतुकीत बदल; 'या' पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं आवाहन |
गणेश मंदिराच्या सभामंडपात अश्वांचा प्रवेश ; विश्वस्त, मंडळाच्या कार्यकर्त्यांतर्फे अश्वांचे पूजन |
नऊ ग्रामपंचायतींच्या इमारत बांधकामाची स्थगिती उठली |
तळबीड पोलिसांकडून 16 लाख 94 हजार रुपयांचा गुटखा जप्त; दोघांवर गुन्हा |
अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला |

सैदापुरात घरफोडी; 65 हजारांचा ऐवज लंपास |
वावदरे येथून एकजण बेपत्ता |
मारहाण केल्याप्रकरणी सहा जणांविरुध्द गुन्हा |
मारहाण करुन दुखापत केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
राजवाडा परिसरात युवकावर कोयत्याने वार |