12:00am | Sep 30, 2020 |
फलटण : काळज ता. फलटण येथील एका दहा महिन्याचा चिमुकल्याला एका पुरुषाने व महिलेने दुचाकीवरून पळवून नेल्याची घटना घडल्याने फलटण तालुक्यात खळबळ उडाली आहे. दरम्यान संशयित आरोपींच्या शोधार्थ लोणंद पोलिसांनी पथके पाठवली आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, रामनगर (काळज) ता. फलटण येथून मंगळवार दिनांक 29 सप्टेंबर रोजी दुपारी चारच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या एका पुरुष व महिलेने ओमकार त्रिंबक भगत या दहा महिन्याच्या चिमुकल्याला घरातून उचलून पळवून नेले. ही घटना बाळाच्या आईच्या निदर्शनास आल्यानंतर तिने आक्रोश केला. दरम्यान शेजारील लोकांच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर त्यांनी तात्काळ याबाबतची माहिती लोणंद पोलीस स्टेशनला कळवली. यानंतर लोणंद पोलीस ठाण्याचे सपोनि संतोष चौधरी यांनी घटनास्थळी धाव घेऊन तत्काळ पोलिसांची पथके तयार करून संशयित आरोपींच्या शोधार्थ पाठवली असून अंदाजे पंचवीस वर्षे वयाचा जीन्स व काळा पोशाख परिधान केलेला पुरुष व गुलाबी रंगाची साडी परिधान केलेली महिला कुठे आढळल्यास त्वरित लोणंद पोलीस स्टेशनला संपर्क साधावा, असे आवाहन सपोनि चौधरी यांनी केले आहे. याप्रकरणी लोणंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान आज काळज येथे घडलेल्या घटनेमुळे संपूर्ण फलटण तालुक्यात खळबळ उडाली आहे.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |