09:07pm | Jan 21, 2023 |
सातारा : येथील शामसुंदरी चॅरिटेबल अँड रिलीजियस सोसायटीच्या के. एस. डी. शानभाग विद्यालय आणि जुनियर कॉलेज च्या वतीने नव्याने उभारण्यात आलेल्या इन डोअर आनंद स्विमिंग पूल चे उद्घाटन सातारा जिल्ह्याचे राज्यसभेचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या हस्ते, तर विद्यालयाच्याच भागीरथी क्रिकेट नेट प्रॅक्टिस ग्राउंडचे उद्घाटन सातारा -जावली तालुक्याचे विद्यमान आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते संपन्न होणार आहे.
रविवारी 22 जानेवारीला हा उद्घाटन सोहळा दुपारी 4 वाजता आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती संस्थेचे संस्थापक व ज्येष्ठ क्रीडा मार्गदर्शक रमेश शानभाग यांनी दिली.
समाजकार्यात सुरुवातीपासूनच रस असलेल्या कै. शामन्ना शानभाग यांचे शाळा उभारणीचे स्वप्न साकारण्यासाठी त्यांचे सुपुत्र व ज्येष्ठ क्रीडा संघटक व मार्गदर्शक रमेश शानभाग यांनी सन 1990 मध्ये के. एस. डी. शानभाग विद्यालय या इंग्रजी माध्यमाच्या शाळेची उभारणी केली. सुरुवातीला लावलेले हे इवलेसे रोप आज वटवृक्ष होतो आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच इतर अनेक खेळांच्या सोयी सुविधा देत असताना विद्यार्थ्यांना पोहण्यासाठी जलतरण तलाव विद्यालयात असावा असा रमेश यांना मानस होता. त्यांच्या अथक प्रयत्नातून तो पूर्ण होतो आहे.
संस्थेचे मार्गदर्शक आणि ज्यांच्या नावाने ही संस्था उभारली ते स्वर्गीय शामराव दासप्पैया शानभाग यांचे ज्येष्ठ बंधू आनंद दासपैया शानभाग यांच्या स्मृतिप्रित्यर्थ या स्विमिंग पूल ला आनंद स्विमिंग पूल असे नाव देण्यात आले असून त्यांच्या पत्नी स्वर्गीय भागीरथी आनंद शानभाग यांच्या स्मृतिप्रत्यर्थ क्रिकेट ग्राउंडचे भागीरथी असे नामकरण करण्यात आले आहे. या शाळेला रमेश शानभाग यांचे पिताश्री स्वर्गीय शामराव आणि मातोश्री स्वर्गीय सुंदराबाई यांच्या स्मृती प्रित्यर्थ ट्रस्टचे नाव शामसुंदरी असे देण्यात आले आहे. संस्थेच्या वतीने विद्यालयाने आतापर्यंत 26 वर्षांची यशस्वी वाटचाल केली असून आत्तापर्यंत विद्यालय व जुनिअर कॉलेज मधून हजारो आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तसेच गुणवान विद्यादान करून यशाची परंपरा कायम ठेवून आहेत.
गेली बारा वर्षे विद्यालयाच्या इयत्ता दहावी व इयत्ता बारावी साठी शंभर टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली आहे. शैक्षणिक योगदाना बरोबरच विविध प्रकारच्या खेळामध्ये संस्थेने दिलेले योगदान अतिशय मोलाचे आणि सातारा जिल्ह्याच्या नावाची वाटचाल राज्य देश तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याचे काम या विद्यालयाच्या नामवंत खेळाडूंनी केले आहे.
संपूर्ण महाराष्ट्रात खाजगी विद्यालयाच्या वतीने उभारण्यात आलेला जलतरण तलाव हा बहुदा सातारा येथे शानभाग विद्यालयाच्या द्वारे एकमेव असून या जलतरण तलावामुळे जलतरण प्रकारांमध्ये शालेय स्तरावर अधिकाधिक जलतरणपटू निर्माण होण्यासाठी याची मोठी मदत होणार आहे. तसेच क्रिकेट नेट प्रॅक्टिस ग्राउंड मुळे क्रिकेट खेळात आपले नैपुण्य दाखवत भविष्यात या विद्यालयाच्या मैदानावर आपले खेळाडू यशस्वी प्रशिक्षण घेऊन उच्चस्तरावर खेळाची वाटचाल करतील, असा विश्वास वाटतो. म्हणूनच या दोन उपक्रमांची उभारणी करण्यात आल्याची माहिती संस्थेचे संस्थापक रमेश शानभाग यांनी यावेळी दिली.
या कार्यक्रमासाठी संस्थेचे विद्यमान विश्वस्त तसेच सौ. उषा शानभाग, संचालिका सौ. आंचल घोरपडे तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. सर्व हितचिंतक पालक सातारकर नागरिक यांनी या उद्घाटन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन के. एस. डी. शानभाग विद्यालय व जुनिअर कॉलेज सातारा यांच्या वतीने करण्यात आले आहे.
तडवळे सं. वाघोली येथील स्टोन क्रशर बंद करा |
मोबाईलची चोरी |
सुमारे साडेसात लाख रुपयांच्या दागिन्यांसह रोख रकमेची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा |
गाडीच्या बॅटऱ्यांची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
दुकानातील साहित्य चोरी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अमितवर फायरिंग करुन हल्लेखोरांनी चिरला होता त्याचा गळा |
महिलेच्या खून प्रकरणातील आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या |
शहर पोलिसांची चौकशी करा |
गणेश जयंती निमित्त साताऱ्यात उद्या विविध कार्यक्रम |
...तर सहकाराला कोणीही पराभूत करु शकणार नाही : विद्याधर अनास्कर |
कोयता गँगच्या दहशतीनंतर वाढे फाटा येथे गोळीबार |
घरफोडी करून 8 हजारांचे साहित्य चोरीस |
उपचारापुर्वी एकाचा मृत्यू |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
दुकानातील साहित्य चोरी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अमितवर फायरिंग करुन हल्लेखोरांनी चिरला होता त्याचा गळा |
महिलेच्या खून प्रकरणातील आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या |
शहर पोलिसांची चौकशी करा |
गणेश जयंती निमित्त साताऱ्यात उद्या विविध कार्यक्रम |
...तर सहकाराला कोणीही पराभूत करु शकणार नाही : विद्याधर अनास्कर |
कोयता गँगच्या दहशतीनंतर वाढे फाटा येथे गोळीबार |
घरफोडी करून 8 हजारांचे साहित्य चोरीस |
उपचारापुर्वी एकाचा मृत्यू |
धक्काबुक्की केल्याप्रकरणी परस्पर विरोधी तक्रारी दाखल |
दोन वेगवेगळ्या ठिकाणाहून बॅटर्यांची चोरी |
शॉक लागून एकाचा मृत्यू |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
8 कोटी 3 लाख रुपयांच्या फसवणूक प्रकरणी 19 जणांवर गुन्हा |