05:51pm | Mar 13, 2022 |
कराड : गोवारे, ता. कराड येथील किसन यादव हे ग्रामपंचायत कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहेत. परंतु, ग्रामपंचायतीकडून त्यांना किमान वेतन फरक व राहणीमान भत्ता देण्यास टाळाटाळ होत होती. याप्रकरणी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा परिषदेने पाठपुरावा करून त्यांना न्याय मिळवून दिला आहे.
किसन बाबुराव यादव हे गोवारे ग्रामपंचायतीत पाणीपुरवठा कर्मचारी म्हणून कामास होते. ते डिसेंबर २०१७ मध्ये निवृत्त झाले. परंतु, ग्रामपंचायतीकडून त्यांना किमान वेतन फरक व राहणीमान भत्ता देण्यास टाळाटाळ होत होती. याप्रश्नी त्यांनी वारंवार ग्रामपंचायतीकडे विनवणी करूनही ग्रामपंचायतीने त्याकडे दुर्लक्ष केले. त्यांनतर यादव यांनी याबाबत आंतरराष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा परिषदेकडे तक्रार करून दाद मागितली.
त्यानुसार मानवाधिकार सुरक्षा परिषदेचे सातारा जिल्हाध्यक्ष रवींद्र डोंबे यांच्यासह पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख परशुराम खुडे व कराड तालुकाध्यक्ष रणजीत पाटील यांनी या प्रकरणाची हकीकत पंचायत समिती गटविकास अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. तसेच यादव यांना न्याय मिळवून देण्याची विनंती केली. याप्रकरणी सहाय्यक गटविकास अधिकारी भूपाल कांबळे यांनी सेवानिवृत्त कर्मचारी किसन यादव व गोवारे ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी यांना पंचायत समितीत पाचारण केले. त्यांच्या दालनात झालेल्या बैठकीत या प्रकरणावर सुनावणी करण्यात आली. त्यामध्ये सहा. गटविकास अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायत दप्तराची पाहणी केली. त्यानुसार मंजूर वेतन, राहणीमान भत्ता व प्राव्हीडंट फंड अशी एकूण थकीत रक्कम ६ हजार ७८० रुपये ग्रामपंचायतीने मार्च २०२२ मध्ये कर्मचारी किसन यादव यांना अदा करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.
त्यामुळे आंतरराष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा परिषदेच्या पाठपुराव्याला यश आले असून तक्रारदार सेवानिवृत्त ग्रामपंचायत कर्मचारी किसन यादव यांना अखेर न्याय मिळाला आहे. याबद्धल किसन यादव यांनी मानवाधिकार सुरक्षा परिषदेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र डोंबे यांच्यासह संघटनेचे आभार मानले.
गरजू माणसाला मिळालेली मदत खूप मोलाची
आंतरराष्ट्रीय मानवाधिकार परिषदेमार्फत पाठपुरावा केल्याने ग्रामपंचायतीचे सेवानिवृत्त कर्मचारी किसान यादव यांना न्याय मिळाला आहे. एका गरजू माणसाला मिळालेली मदत खूप मोलाची आहे. याचे आम्हाला सात्विक समाधान आहे.
- रवींद्र डोंबे (जिल्हाध्यक्ष, आंतरराष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा परिषद)
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |