05:54pm | Aug 13, 2022 |
फलटण : स्वराज नागरी सहकारी पतसंस्थेच्या फसवणुकीच्या तक्रारीवरुन फलटण पोलिसांनी दिगंबर आगवणे याला अटक करुन त्याची पोलीस कोठडीत रवानगी केली होती. त्यानंतर आता आगवणेच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. दुसऱ्या एका आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यात त्याला फलटण पोलिसांनी अटक केली असून त्याला न्यायालयासमोर उभे केले असता पुन्हा 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याने आगवणेचा पाय आणखी खोलात गेला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, स्वराज नागरी पतसंस्थेच्या फसवणूकप्रकरणी अटकेत असलेल्या दिगंबर आगवणे याचा जामिनासाठीचा अर्ज न्यायालयाने फेटाळला. आता आगवणे याच्या आयुर ट्रेडिंग कंपनीसंदर्भात दाखल झालेल्या फसवणुकीच्या गुन्ह्याच्या अनुषंगाने त्याला अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्याला दि. 19 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. याबाबत आयमत गनिम शेख (रा. लक्ष्मीनगर, फलटण) यांनी दिगंबर रोहिदास आगवणे याच्या विरुध्द तक्रार दिली आहे.
तक्रारीत शेख यांनी म्हटले आहे की, 2016 साली आयमत गनिम शेखर व त्यांचा भाऊ अमीर गनिम शेख या दोघांना दिगंबर आगवणे याने त्याच्या आयुर ट्रेडिंग कंपनीत 1 कोटी रुपये गुंतवणूक केल्यास दरमहा दोन लाख रुपये परतावा देतो, चांगला फायदा होईल, मी तुम्हाला कंपनीत भागीदार करुन घेतो, असे अमिष दाखवले. त्यावेळी शेख यांनी आमच्याकडे 10 लाख रुपये असल्याचे सांगितले. त्यावर आगवणे याने त्याचा मित्र विनोद धुमाळ हा तुम्हाला कर्ज काढून देण्यास मदत करेल. तुमच्या घरावर बँक ऑफ पटियाला येथून 45 लाख रुपयांचे कर्ज मंजूर होईल. त्या बदल्यात धुमाळ याला 5 लाख रुपये कमीशन द्यावे लागेल, असे सांगितले.
त्यावर शेख कुटुंबियांची धुमाळ यांनी बँक मॅनेजरची भेट घडवून आणली. आमच्या घराची कागदपत्रे अपूर्ण असताना आगवणे व धुमाळ यांनी बनावट कागदपत्रे तयार करुन शेख यांच्या नावावर कर्ज प्रकरण करुन आईवडिलांना जामीनदार करुन घेतले. पहिल्यांदा 25 लाखांचे कर्ज प्रकरण केले व त्यानंतर 15 लाख रुपयांचे कर्ज प्रकरणे मंजूर करुन घेतली. शेख कुटूंबियांनी त्यांच्याकडील 10 लाख रुपये, कोळकीतील हेमंत जगताप यांच्याकडून 29 लाख रुपये कर्ज, झिरपवाडीतील जमिनीपोटी ॲडव्हान्स मिळालेले 15 लाख रुपये असे 54 लाख रुपये दिगंबर आगवणे याला दिले. अशा प्रकारे बँकांचे कर्ज व घरातील रक्कम असे मिळून दिगंबर आगवणे याला शेख कुटूंबियांनी 95 लाख रुपये आयुर कंपनीत भागीदार करुन घेतो म्हणून दिलेले आहेत. आणखीन भांडवल लागणार म्हणून आगवणे याने अभ्युदय बँक पुणेचे कर्ज प्रकरण केले असून त्याला शेख यांना जामीनदार करुन घेतले आहे.
त्यानंतर परतावा येत नसल्याने शेख आगवणे याच्याकडे पैसे मागू लागले असता त्याने 95 लाख रुपयांपैकी फक्त 7 लाख रुपये परत दिले. त्यानंतर लवकरच आपले मोठे काम होणार आहे. तुमचे पैसे परत मिळतील असे 2016 सालापासून आगवणे शेख कुटुंबियांना सांगत होता. मात्र, 2020 साल उजाडले तरी देखील आगवणे याने 88 लाख रुपयांपैकी काहीच पैसे दिले नसल्याची शेख यांची तक्रार असून याबाबत त्यांनी फलटण शहर पोलीस ठाण्यात रोहिदास दिगंबर आगवणे रा. गिरवी, ता. फलटण याच्याविरुध्द तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात आगवणे याला अटक केली असून न्यायालयाने दि. 19 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
अतिरेकीपणामुळे मिस्टर नटवरलाल अखेर गोत्यात
दिगंबर आगवणे याने राजकीय पक्षांच्या नेत्याशी संबंध जुळवून आपले वलय निर्माण केले होते. उंची गाड्यातून फिरणे, चैन करणे असे करता-करता त्याने फलटण शहरासह आणखी इतर ठिकाणावरील काहींची 50 ते 60 कोटी रुपयांची फसवणूक केल्याची चर्चाही फलटण तालुक्यात सुरु असून हा मिस्टर नटवरलाल त्याच्या अतिरेकीपणामुळे आता चांगलाच गोत्यात आला असल्याचे फलटणकर बोलत आहेत.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |