10:07pm | Nov 07, 2021 |
फलटण : फलटण तालुक्याचे दिगंबर आगवणे यांच्याकडून पुन्हा एकदा सर्वसामान्य लोकांना मदतीचा हात म्हणून अंदाजे वीस हजार हजार लोकांना किराणा वाटप करून सर्वसामान्यांची दिवाळी गोड केली.
गेली दिड-दोन वर्ष कोरोना महामारी मुळे संपूर्ण जग ग्रासले होते लॉकडाऊन, दवाखान्यातील खर्च या मुळे हातावरील पोट असणार्या गरीब लोकांचे अतोनात हाल झाले. अशा नागरिकांना यंदाची दिवाळी आर्थिक अडचणीची होत असताना कायम सर्वसामान्य लोकांच्या मदतीला धावून जाणारे दिगंबर आगवणे हे पुन्हा एकदा नागरिकांच्या मदतीला धावून आले. त्यांनी अंदाजे वीस हजार हजार लोकांना किराणा साहित्य मोफत दिले. कोणतीही राजकीय सत्ता नसताना, कोणतेही राजकीय पद नसताना तालुक्यावर असलेल्या सर्वसामान्य लोकांच्या प्रेमापोटी दिगंबर आगवणे कायम मदतीला धावून जात असतात. कोरोना काळातही त्यांनी 1000 बेडचे कोविड हॉस्पिटल उभारून गरिबांना मोफत उपचार दिले. कोरोना काळातील लॉकडाऊन मुळे नागरिकांची आर्थिक परिस्थिती म्हणावी तशी अजून सुधारली नाही. ही गरज ओळखून दिगंबर आगवणे यांनी सर्वसामान्य नागरिकांना दिवाळी किराणा वाटप मदत करण्याचा निर्णय घेतला. याला नागरिकांनी प्रचंड असा प्रतिसाद दिला. दिगंबर आगवणे यांचे संपर्क कार्यालय येथे सकाळी दहा ते रात्री अकरा वाजेपर्यंत नागरिकांना मोफत किराणा वाटप करण्यात आले. विशेष म्हणजे एकही नागरिक दिवाळी किराणा न घेताना घरी गेला नाही. हे विशेष असून पुढच्या वर्षी अडीच लाख लोकांना दिवाळीत किराणा वाटप करण्याचे सामर्थ्य आपल्याला मिळावे, अशी भावना दिगंबर आगवणे यांनी व्यक्त केली आहे.
यावेळी पं.स. सदस्य सौ.जयश्री आगवणे, संभाजी शिंदे, संतोष सोळस्कर, लालासाहेब साबळे, बाळासाहेब धुमाळ, संजय धायगुडे, दत्तात्रय आगवणे, संतोष आगवणे, सोमनाथ रासकर, किरण लाळगे, विक्रम लबांते, ज्ञानेश्वर कोळेकर, रणजीत धुमाळ, शुभम लंबाते व इतर सहकारी यांची उपस्थिती होती.
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |