11:31pm | Sep 22, 2020 |
सातारा : मंगळवारी जिल्ह्यातील 34 बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून 708 बाधित निष्पन्न झाले. तसेच जिल्ह्यातील 500 नागरिकांना कोरोनातून बरे झाल्याने डिस्चार्ज देण्यात आला असून 807 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
जिल्ह्यातील 34 कोरोनाबाधितांचा मंगळवारी उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने जिल्ह्यातील कोरोनाबळींची संख्या 940 वर पोहोचली आहे, तर 708 जण बाधित निष्पन्न झाल्याने जिल्ह्यातील बाधितांचा आकडा 32 हजारांच्या पुढे म्हणजेच 32 हजार 222 वर पोहोचला आहे. तसेच जिल्ह्यातील विविध रुग्णालये, कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेवून कोरोनातून खडखडीत बरे झालेल्या 500 नागरिकांना घरी सोडण्यात आल्याने जिल्ह्यातील कोरोनामुक्तांची संख्या 21 हजार 625 वर पोहोचली असून 807 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याचीही माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
34 बाधितांचा मृत्यू
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे उपचार घेत असलेल्या वाढे, सातारा येथील 37 वर्षीय महिला, रहिमतपूर येथील 64 वर्षीय पुरुष, शेंद्रे सातारा येथील 70 वर्षीय पुरुष, कोंढवे सातारा येथील 49 वर्षीय पुरुष, गडकर आळी सातारा येथील 75 वर्षीय महिला, निगडी येथील 49 वर्षीय पुरुष, रामाचा गोट सातारा येथील 55 वर्षीय पुरुष, चरेगाव, ता. कराड येथील 78 वर्षीय पुरुष, चिंचळी ता. सातारा येथील 70 वर्षीय पुरुष, मंगळवार पेठ सातारा येथील 60 वर्षीय पुरुष, काशिळ सातारा येथील 80 वर्षीय पुरुष, तसेच जिल्ह्यातील विविध खासगी हॉस्पिटलमध्ये शाहुपुरी सातारा येथील 83 वर्षीय पुरुष, सासकल ता. फलटण येथील 50 वर्षीय पुरुष, कोरेगाव येथील 78 वर्षीय पुरुष, गोपुज ता. खटाव येथील 50 वर्षीय महिला, सदाशिव पेठ सातारा येथील 72 वर्षीय पुरुष, मुंबई येथील 83 वर्षीय महिला, सदर बझार येथील 75 वर्षीय व 60 वर्षीय पुरुष, कृष्णानगर सातारा येथील 74 वर्षीय पुरुष, पाटण 74 वर्षीय पुरुष, वडूथ ता. सातारा येथील 85 वर्षीय पुरुष, तसेच उशिरा कळविलेले कराड येथील 72 वर्षीय पुरुष, जत सांगली येथील 75 वर्षीय महिला, गजानन हौसिंग सोसायटी कराड येथील 70 वर्षीय महिला, बोरगाव, वाळवा येथील 64 वर्षीय पुरुष, मलकापूर कराड येथील 68 वर्षीय पुरुष, बनवडी कॉलनी कराड येथील 56 वर्षीय पुरुष, रेठरे बु कराड येथील 56 वर्षीय पुरुष, बनवडी कराड येथील 46 वर्षीय पुरुष, शनिवार पेठ कराड येथील 88 व 66 वर्षीय पुरुष, आगाशिवनगर कराड येथील 58 वर्षीय पुरुष, शिवाजी हौस कराड येथील 70 वर्षीय पुरुष अशा एकूण 34 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.
807 जणांचे नमुने पाठविले तपासणीला
स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 26,उपजिल्हा रुग्णालय कराड 16, उपजिल्हा रुग्णालय फलटण 65, कोरेगाव 117, वाई 109, खंडाळा 51, रायगांव 118, पानमळेवाडी 86, मायणी 33, महाबळेश्वर 50, दहिवडी 39 व कृष्णा मेडीकल कॉलेज कराड 97 असे एकूण 807 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहेत.
आतापर्यंत 45,538 रुग्णांची अॅन्टिजन (RAT) तपासणी
तसेच सातारा जिल्ह्यात विविध शासकीय व खाजगी तपासणी केंद्रात आतापर्यंत आरएटी (RAT) साठी 48,538 रुग्णांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले असून, यापैकी 12,600 रुगणंचा अहवाल पॉझिटिव्ह तर 35,938 रुग्णांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे, अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |