08:42pm | May 17, 2020 |
सातारा : सातारा औद्योगिक वसाहतीतील कूपर चौकात एका भूखंडामध्ये औद्योगिक विकास महामंडळाचे नियम धाब्यावर बसवून मनमानीपणे सोलर पॅनल बसवले असून त्यामुळे या युनिटमध्ये काम करणाऱ्या कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. कामगारांच्या आरोग्याच्या दृष्टीनेही हा प्रकार चुकीचा आहे. मात्र महामंडळाचे अधिकारी याकडे डोळेझाक करत असल्याने याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
वास्तविक औद्योगिक वसाहतीमध्ये मिळालेल्या जागा या फक्त उत्पादन प्रकियेसाठी लीजवर दिलेल्या असतात. यासंबंधी असलेल्या नियमांच्या अनुषंगाने संबंधित लीजधारक भूखंडधारकाला सर्व बाबींची पूर्तता करणे आवश्यक असते. नियमानुसार लीजवर दिलेल्या भूखंडामध्ये युनिटची उभारणी करताना चारीही बाजुला ठराविक मोकळी जागा सोडणे बंधनकारक असते. त्याप्रमाणे बांधकामासाठी नियमावलीप्रमाणे पूर्वपरवानगी व बांधकाम पूर्ण झाल्यानंतर त्याबाबतचे प्रमाणपत्र घेणे अनिवार्य असते. पण कूपर चौकात असलेल्या एल - १ या भूखंडामध्ये मनमानीपणे सोलर पॅनल बसवले आहेत. सर्व नियमांची पायमल्ली करत एल - १ / १ व २ या भूखंडाच्या रांगेत सोलर पॅनलची उभारणी करण्यात आली आहे. त्यात कुठलेही नियम पाळले नसल्याचे दिसते. अशा प्रकारच्या उभारणीमुळे त्याखाली काम करत असलेल्या कामगारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होतो. तसेच अशा इन्स्टॉलेशनमुळे विविध प्रकारचे डास व जंतुंचा प्रादुर्भाव होऊ शकतो. संबंधित युनिटला लागूनच एक फार्मा कंपनी आहे. त्या ठिकाणी पाळले जाणारे आरोग्य सुरक्षिततेचे नियम अतिशय कडक असतात. अमेरिकेच्या यूएसएफडीए सारख्या कंपन्यांकडून फार्मा कंपनीचे लेखा परीक्षण केले जाते. असे असताना शेजारच्याच युनिटमधून जीवजंतू व कोरोनासारख्या भीतीदायक आजाराचा प्रसार होण्याचा धोका व्यक्त केला जात आहे. अशा चुकीच्या कामाला परवानगी कशी मिळाली, काम सुरू असताना ते संबंधित अधिकाऱ्यांना कसे दिसले नाही आणि या कामाला पूर्णत्वाचे प्रमाणपत्र कोणी व कसे दिले याची चौकशी होणे गरजेचे आहे. आश्चर्य म्हणजे मोठ्या व मध्यम उद्योगांनी सर्व नियमांचे पालन करावे म्हणून एमआयडीसी जागरूक असते. परंतु तेच नियम छोट्या उद्योगांना लागू केले जात नाहीत. म्हणजे नियम पाळणाऱ्यांनाच फक्त कायद्याची भीती दाखवली जाते. जे नियम पाळत नाहीत, त्यांच्यासाठी मात्र एमआयडीसीचा कायदा काहीच नसतो. त्यांच्या बाबतीत अधिकारी वर्ग इतका कनवाळू कसा होतो हे गौडबंगालच आहे. या प्रकाराच्या संदर्भात तरी एमआयडीसीचे अधिकारी लक्ष घालणार का ? याकडे सातारच्या उद्योग जगताचे लक्ष लागले आहे.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |