03:42pm | Sep 24, 2022 |
सातारा : गत दोन दिवसांपासून महाराष्ट्रात फोटो वॉर सुरु आहे. खासदार श्रीकांत शिंदे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खुर्चीत बसून कारभार चालवत असल्याचा फोटो राष्ट्रवादीच्या नेत्याने ट्विट केला. त्यावर श्रीकांत शिंदे यांनी तो घरातील असल्याचा खुलासा केला. आता हा वाद शांत होईल असे वाटत असताना शिंदे गटाच्या म्हात्रे यांनी सुप्रिया सुळे यांचा मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसलेला फोटो व्हायरल करत वादात ठिणगी टाकली असतानाच शनिवारी सातारचे बिगबॉसफेम अभिजित बिचकुले यांचाही मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसलेला मार्फ केलेला फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत असून यावर प्रतिक्रियांचा पाऊस पडला आहे.
शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसलेला बनावट फोटो वादात सापडला आहे. तो फोटो मॉर्फ असल्याचा दावा करत राष्ट्रवादीने फोटोमागचं सत्य सांगून शीतल म्हात्रेंना आरसा दाखवला आहे. शीतल म्हात्रेंच्या ट्विटवर राष्ट्रवादीचे नेते आक्रमक झाले आहेत. ट्विट डिलीट करा नाहीतर कारवाई करु, असा इशाराच राष्ट्रवादीने शीतल म्हात्रेंना दिला आहे. दरम्यान, पुण्यातील राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील यांनी शीतल म्हात्रेंवर बोचरी टीका केलीये. म्हात्रेताई, मिंधे गटाला खूश करण्यासाठी फोटो टाकला काय?, असा सवाल त्यांनी फेसबुक पोस्ट करुन विचारला होता.
राष्ट्रवादीने हा फोटो एडिटेड असल्याचे पुरावे सादर केले. त्यानंतर शीतल म्हात्रेंनी घूमजाव केले आहे. हा फोटो खरा असल्याचा दावा आपण कुठेही केला नाही, अशी सारवासारव शीतल म्हात्रे यांनी केली आहे. राष्ट्रवादीकडून पोलिसात दिलेल्या तक्रारी विरोधात कायदेशीर सल्ला घेऊन पुढील निर्णय घेण्यात येईल असं शीतल म्हात्रे म्हणाल्या आहेत. तोपर्यंत म्हात्रे यांनी जो फोटो टाकला होता. तोच सुप्रिया सुळे, राजेश टोपे व दिलीप वळसे पाटील यांचा एकत्रित असलेला फोटो कोणीतरी मार्फ करत सुप्रिया सुळेंच्या जागी अभिजित बिचकले मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसले व त्यांच्या आजुबाजुला राजेश टोपे व दिलीप वळसे पाटील असल्याचा फोटो व्हायरल केला. सोशल मिडियावर बिचकुले मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसले असल्याचा फोटो सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत असून त्यावर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रियाही पडत आहेत.
बिचकुलेंच्या फोटोची सोशल मिडियावर चर्चा
अभिजित बिचकुले हे साताऱ्यातील वेगळेच रसायन आहे. कधी काय बोलतील याचा नेम नसतो. थेट राष्ट्रपती, पंतप्रधानांवर देखील ते मुक्तपणे टिका करतात. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठीही ते एकदा इच्छूक होते तर विधानसभा निवडणुकीत 288 जागांवर आमदार विजयी करुन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनण्याचे अभिजित यांचे स्वप्न आहे. सध्या बिचकुले पुण्यात उद्योग व्यवसायात रमले आहेत. मध्यंतरी थेट सलमान खानला अंगावर घेवून ते देशभरात प्रसिध्द झालेत. आता बरेच दिवस अभिजित शांत असताना फोटो वॉरमध्ये थेट मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत अभिजित बिचुकले यांना बसवून व्हायरल झालेला फोटो सोशल मिडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.
तडवळे सं. वाघोली येथील स्टोन क्रशर बंद करा |
मोबाईलची चोरी |
सुमारे साडेसात लाख रुपयांच्या दागिन्यांसह रोख रकमेची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा |
गाडीच्या बॅटऱ्यांची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
दुकानातील साहित्य चोरी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अमितवर फायरिंग करुन हल्लेखोरांनी चिरला होता त्याचा गळा |
महिलेच्या खून प्रकरणातील आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या |
शहर पोलिसांची चौकशी करा |
गणेश जयंती निमित्त साताऱ्यात उद्या विविध कार्यक्रम |
...तर सहकाराला कोणीही पराभूत करु शकणार नाही : विद्याधर अनास्कर |
कोयता गँगच्या दहशतीनंतर वाढे फाटा येथे गोळीबार |
घरफोडी करून 8 हजारांचे साहित्य चोरीस |
उपचारापुर्वी एकाचा मृत्यू |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
दुकानातील साहित्य चोरी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अमितवर फायरिंग करुन हल्लेखोरांनी चिरला होता त्याचा गळा |
महिलेच्या खून प्रकरणातील आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या |
शहर पोलिसांची चौकशी करा |
गणेश जयंती निमित्त साताऱ्यात उद्या विविध कार्यक्रम |
...तर सहकाराला कोणीही पराभूत करु शकणार नाही : विद्याधर अनास्कर |
कोयता गँगच्या दहशतीनंतर वाढे फाटा येथे गोळीबार |
घरफोडी करून 8 हजारांचे साहित्य चोरीस |
उपचारापुर्वी एकाचा मृत्यू |
धक्काबुक्की केल्याप्रकरणी परस्पर विरोधी तक्रारी दाखल |
दोन वेगवेगळ्या ठिकाणाहून बॅटर्यांची चोरी |
शॉक लागून एकाचा मृत्यू |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
8 कोटी 3 लाख रुपयांच्या फसवणूक प्रकरणी 19 जणांवर गुन्हा |