पुणे : महाराष्ट्रात यंदा मान्सूनपूर्व दुष्काळाची स्थिती होती. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि कोकणात अगदी नावालाच मान्सूनपूर्व बरसला. गोवा, गुजरातमधील सौराष्ट्र आणि कच्छमध्येही मान्सूनपूर्व पावसाने पाठच दाखवलेली होती. कर्नाटक किनारपट्टीचा भाग, तामिळनाडू आणि पुद्दुचेरीतही मान्सूनपूर्व पावसाने अपेक्षित हजेरी लावली नाही. केरळमध्ये 6 जूनपर्यंत मान्सून दार ठोठावेल, असा अंदाज आहे; पण या क्षणापर्यंत केवळ 99 मिलिमीटर पाऊस पडला आहे. हवामान विभागाकडील आकडेवारीनुसार गेल्या
मान्सूनपूर्व दुष्काळाची इतकी गंभीर स्थिती याआधी 65 वर्षांपूर्वी एकदा अनुभवायला आली होती. जम्मू-काश्मीर, हिमाचल, उत्तराखंड, पश्चिम उत्तर प्रदेश, उत्तर कर्नाटक, तेलंगणा आणि रायलसीमातही मान्सूनपूर्व पावसाने काही शिडकावे झाले आहेत. अवघा देश वळवाचा हा कोडगेपणा पाठीवर घेऊनच मान्सूनकडे डोळे लावून आहे. गेले काही दिवस मान्सून अंदमानातच रेंगाळतो आहे.
मान्सूनपूर्व पावसाने पाठ फिरवली, असे 1954 मध्ये घडले होते. त्यानंतरचा हा तिसरा अनुभव आहे. 1954 मध्ये देशात 93.9 मिलिमीटर पाऊस नोंदवला गेला होता. त्यानंतर 2009 मध्ये मार्च, एप्रिल आणि मे या तीन महिन्यांत 99 मि.मी. पाऊस झाला होता. 2012 मध्ये 90.5 मिलिमीटर पाऊस झाला आणि त्यानंतर आता 2019 मध्ये 99 मिलिमीटर एवढा मान्सूनपूर्व पाऊस बरसलेला आहे.
महाराष्ट्रात मार्च ते मेदरम्यान सरासरी 55 ते 100 मिलिमीटर पाऊस पडतो. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार महाराष्ट्रातील चार उपविभागांतून तो प्रत्येकी 30 ते 35 मिलिमीटर अपेक्षित होता. परंतु, यंदा या काळात 6.6 मिलिमीटर इतकाच मान्सूनपूर्व पाऊस झालेला आहे. गेल्या शतकामध्ये एकूणच पश्चिम भारतामध्ये मान्सूनपूर्व पावसाचे प्रमाण खालावलेले आहे. विशेषत: महाराष्ट्रात ही समस्या अधिकच गंभीर बनलेली आहे.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |