01:57am | Jan 23, 2020 |
सातारा : नागठाणे आरोग्य केंद्रासाठी 12 गुंठे क्षेत्र अधिग्रहीत करणार असल्याचे सांगून प्रत्यक्षात 20 गुंठे क्षेत्र ताब्यात घेऊन त्यावर इमारत बांधल्याचा आरोप करीत आणि उर्वरित जागेत सुरू असलेल्या बांधकामास अटकाव करून दांडगावा करणाऱ्या नागठाणे ग्रामपंचायतीच्या दहशतीविरोधात भीमशक्ती संघटनेने आजपासून सातारा येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले.
याबाबत अधिक माहिती अशी की, नागठाणे (ता. सातारा) येथील बाळू गुंडा कांबळे व श्रीमती कुसुम भीमा कांबळे यांच्या मालकीचे गट क्रमांक 61 हे क्षेत्र आहे. नागठाणे प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी त्यातील 12 गुंठे जमीन ॲकवायर करण्यात आली होती. मात्र प्रत्यक्षात 20 गुंठे जागेत आरोग्य केंद्र व कर्मचारी निवास इमारती बांधण्यात आल्या आहेत. शासनाने प्रत्यक्षात 12 गुंठे सांगून आठ गुंठे जादा जमीन हडप केल्याचा आरोप कांबळे कुटुंबियांनी केला आहे. बाळू व कुसूम कांबळे हे गट नंबर 61 चे मूळ मालक असून मागासवर्गीय समाजातील व अशिक्षित आहेत. मात्र त्याचा गैरफायदा घेऊन सरपंच व ग्रामविकास अधिकारी काही स्थानिक पुढार्यांना हाताशी धरून त्यांची जागा हडपण्याचा उद्देशाने त्यांना नानाविध प्रकारे त्रास देत आहेत. कांबळे कुटुंबाच्या मालकीचे 12 गुंठे क्षेत्र अॅकवायर झाल्याने त्यास गट क्रमांक 61 ब आणि अधिग्रहीत क्षेत्राशिवाय उर्वरित जागेस 61अ असा गट क्रमांक प्राप्त झाला आहे. त्याचा मूळ मालकाच्या नावाने उताराही शासनाने सही शिक्कासह दिला आहे. शासनाने संपादित केलेल्या जागेचा दस्त नसल्याने व चतु:सीमेचा उल्लेख नसल्याने प्राथमिक आरोग्य केंद्र व कर्मचारी निवासाच्या इमारतीचे पक्के बांधकाम 12 ऐवजी 20 गुंठे क्षेत्रात शासनानेच करून कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोपही कांबळे कुटुंबीयांनी केला आहे. वास्तविक या बांधकामा व्यतिरिक्त उर्वरित चार गुंठे क्षेत्र हे मूळ मालकाचे म्हणजेच कांबळे यांचे असून तसा उताराही शासनाकडून त्यांना सही शिक्कानिशी प्राप्त झाला आहे. त्या क्षेत्रावर मूळ मालकाची कायमस्वरूपी वहिवाटही आहे. सध्या त्या जागेत कांबळे यांनी इमारतीचे बांधकाम सुरू केले आहे. त्याबाबतचा ग्रामपंचायतीचा बांधकाम परवाना व ना हरकत दाखला त्यांना लेखी स्वरूपात मिळालेला आहे. मात्र सरपंच व ग्रामसेवक हे काही स्थानिक पुढार्यांना हाताशी धरून ती जागा हडपण्याचा उद्देशाने बाळू कांबळे व कुसुम कांबळे आणि त्यांच्या कुटुंबियांना मानसिक त्रास देऊन दहशत निर्माण करीत आहेत. ग्रामपंचायतीच्या आडगेपणामुळे कांबळे कुटुंबीय त्रस्त झाले आहेत. स्वमालकीच्या जागेवर घराच्या बांधकामाचा रितसर परवाना मागितल्यावर व ग्रामपंचायतीने तो दिल्यावरच कांबळे यांनी त्या जागेवर बांधकाम सुरू केले आहे. मात्र ना हरकत दाखला दिल्यावर सहा महिन्यांनंतर दांडगाई करून बांधकामास हरकत घेऊन काम बंद पाडण्याचा उद्योग ग्रामपंचायतीने आरंभला आहे. त्यामुळे कांबळे कुटुंबीय त्रस्त झाले आहेत.
वास्तविक शासनाने अगोदरच 12 ऐवजी 20 गुंठे जमीन ताब्यात घेतल्याने त्याचा शासनाच्या नावाचा स्वतंत्र सातबारा करावा व सरपंच ग्रामपंचायत नागठाणे यांना उताऱ्यावरून हटवावे या मागणीसाठी कांबळे कुटुंब 22 जानेवारी पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.
पाण्यात बुडून आठ वर्षीय मुलाचा मृत्यू |
सातार्यातून युवक बेपत्ता |
निकालावर समाधानी नाही; सरकार पक्षाने अपिलात जावे |
सातारा येथे गजानन महाराज मूर्ती प्राणप्रतिष्ठापनेचा वर्धापन दिन सोहळा |
डॉ. नरेंद्र दाभोलकर खून खटला |
गावदेव मिरवणुकीत जुन्या भांडणाच्या कारणावरून दोन गटांत धुमश्चक्री |
साताऱ्यात पाणीपुरवठ्याचा व्हॉल्व्हला गळती |
सिव्हील हॉस्पिटलच्या पार्कींगमधून दुचाकीची चोरी |
मारहाण प्रकरणी परस्परविरोधी तक्रारी |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा |
सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा |
आर्थिक फसवणूक प्रकरणी दोघांवर गुन्हा |
सराईत गुन्हेगारांकडून पाच घरफोडीचे गुन्हे उघड; 35 तोळे सोन्याचे दागिने हस्तगत |
आर्ट इन मुव्हजतर्फे साताऱ्यात उद्यापासून महिलांसाठी नृत्य कार्यशाळा |
मोदींचा आत्मविश्वास आता गायब झालाय : खासदार शरद पवार |
गावदेव मिरवणुकीत जुन्या भांडणाच्या कारणावरून दोन गटांत धुमश्चक्री |
साताऱ्यात पाणीपुरवठ्याचा व्हॉल्व्हला गळती |
सिव्हील हॉस्पिटलच्या पार्कींगमधून दुचाकीची चोरी |
मारहाण प्रकरणी परस्परविरोधी तक्रारी |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा |
सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा |
आर्थिक फसवणूक प्रकरणी दोघांवर गुन्हा |
सराईत गुन्हेगारांकडून पाच घरफोडीचे गुन्हे उघड; 35 तोळे सोन्याचे दागिने हस्तगत |
आर्ट इन मुव्हजतर्फे साताऱ्यात उद्यापासून महिलांसाठी नृत्य कार्यशाळा |
मोदींचा आत्मविश्वास आता गायब झालाय : खासदार शरद पवार |
स्पर्धेच्या युगात आत्मविश्वासाने उभी राहिलेली पिढी तयार करावी लागेल |
भाऊसाहेब महाराजांच्या जयंतीनिमित्त सातारा, जावलीत भव्य भजन स्पर्धा |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
बॉम्बे रेस्टॉरंट परिसरातून महिला बेपत्ता |
रयत शिक्षण संस्थेमार्फत 9 मे रोजी ‘कर्मवीर पुण्यतिथी’ कार्यक्रमाचे आयोजन |