02:25pm | Sep 25, 2018 |
सातारा : उच्च न्यायालयाने डॉल्बीच्या वापरावर बंदी घातली. त्याची अंमलबजावणीची सक्त ताकीद उच्च न्यायालयाने राज्य गृह विभागाला दिली होती. मात्र, उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही महाराष्ट्रात डॉल्बी दणाणला. अपवाद मात्र सातारा शहर राहिले. जिल्ह्यात फलटण नावाचे संस्थान आहे. या संस्थानात मात्र फलटण नरेशांच्या आदेशाने गणेश विसर्जना दिवशी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांच्या नाकावर टिच्चून फलटणकरांनी डॉल्बीच्या कर्णकर्कश आवाजात फलटण शहर दणाणून सोडले. मात्र, पोलीस अधिकार्यांनी वरिष्ठांना फलटणमध्ये सर्वकाही आलबेल असल्याची चुकीची माहिती दिल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
‘मै खडा तो, सरकार से बडा’ असा डायलॉग संपूर्ण महाराष्ट्रात फेमस करणारे सातारा लोकसभा मतदारसंघाचे खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी उच्च न्यायालयाच्या आदेशालाच आव्हान देत ‘जब तक रहेगा गणपती, तब तक बजेगी डॉल्बी’ असे वक्तव्य केले होते. सातार्यात झालेल्या गणेश मंडळांच्या बैठकीत कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील उदयनराजेंचे वक्तव्य फारच सिरीयसली घेतले. संपूर्ण ताकद सातारा शहरावर केंद्रित करण्यात आली. परिणामी आयजींच्या परिक्षेत्रात डॉल्बी जोरात दणाणला. एवढेच काय, सातारा जिल्ह्यात मोडणार्या फलटण तालुक्यातही गणेश विसर्जना दिवशी कायदा खुंटीला टांगून डॉल्बी कर्णकर्कश आवाजात दणाणला. अबालवृद्धांच्या काळजाचे ठोके चुकले, अनेकांचा बीपी हाय झाला. परंतू पोलीस नावाची यंत्रणा फलटणच्या सरंजामींच्या दावणीला बांधल्यामुळे फलटणमधील डॉल्बीचा आवाज सातारा पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयापर्यंत पोहोचू शकला नाही.
थेट मिरवणुकीतून अनेक टल्ली झालेल्या रसिकांनी फेसबुकद्वारे ‘लाईव्ह’ प्रक्षेपण करीत डीजेंच्या गोंगाटातील ओंगळवाणे नृत्य जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्राला दाखवले. अनेकांनी ‘ही काय भानगड! नांगरे-पाटलांच्या राज्यात चक्क डॉल्बी दणाणतोय?’ असे म्हणत कपाळावर आठ्या पाडल्या. पोलीस अधिकार्यांनीही डेसिबल आणि डॉल्बी यंत्रणेच्या रॅकची मर्यादा सांगून हात झटकण्याचा प्रयत्न केला. सातारा शहराला वेगळा न्याय आणि फलटणला वेगळा न्याय, यह बात कुछ हजम नहीं हुयी, असे अनेक बुद्धिजीवी लोकांना वाटले असावे. सातारचे नेतृत्व करणारे अनेकांना दहशतवादी विचारांचे वाटतात, परंतू निर्विघ्न चेहर्याने राज्यभरात फिरणार्यांच्या मात्र दहशतवादी कारवाया दिसत नाहीत. असो, कायद्याचे पालन करणे हे जिल्ह्यातील सुजाण नागरिकांचे कर्तव्य आहे. सातारा आणि परिसरात 144 कलमाद्वारे डॉल्बी सिस्टम जागेवरच जप्त करण्यात आल्या. त्यामुळे सातारा शहरातील गणेश मंडळांना नाईलाजास्तव पारंपारिक ब्रास बँड, बँजो पथके, ढोल-लेझीम पथकांचा गणेश विसर्जन मिरवणुकीत आधार घ्यावा लागला. जिल्ह्यात 144 कलमाद्वारे संपूर्ण डॉल्बी यंत्रणा सील केल्याचा दावा फलटणच्या निमित्ताने फोल ठरलेला आहे.
फलटण शहर नेहमीच गुन्हेगारीचे केंद्रबिंदू राहिलेले आहे. ‘बोलणार्याची माती विकली जाते’ परंतू फलटण नरेशांनी न बोलता डीजे वाजवून दाखवला. यामुळे खा. उदयनराजेंना पोलिसांच्या खांद्यावर बंदुक ठेवून फलटण नरेशांनी असाही ‘चेकमेट’ दिला आहे. फलटणमधील पोलीस अधिकारी नेहमीच वरिष्ठ अधिकार्यांची दिशाभूल करतात. साणगी-वानगीवर विश्वास न ठेवणारे तत्कालीन पोलीस प्रमुख के. एम.एम. प्रसन्ना, डॉ. अभिनव देशमुख, संदीप पाटील यांनी सोशल इंटिलिजेन्सचा वापर करीत फलटणमध्ये कार्यरत असणार्या पोलीस अधिकारी, कर्मचार्यांवर वचक ठेवलेला होता. त्यामुळेच फलटणमधील गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यात या तिघांनाही यश मिळाले होते. विद्यमान पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांचीही अधिकारी दिशाभूल करतात, हे फलटणमध्ये दणाणलेल्या डॉल्बीच्या निमित्ताने स्पष्ट झालेले आहे. कायदा फाट्यावर मारुन उच्च न्यायालयाचा अवमान करुन डेसिबलच्या पलिकडे डॉल्बीचा आवाज वाढविणार्या फलटणमधील मंडळांवर जिल्हा पोलीस प्रमुख पंकज देशमुख काय कारवाई करतात, याकडे फलटणमधील बुद्धिजीवी व ज्येष्ठ नागरिकांचे लक्ष लागलेले आहे. फलटण हे पाकिस्तानात नसून सातारा जिल्ह्यातच आहे, याची जाणीव पोलीस प्रमुखांनी फलटण नरेशांना करुन द्यायला हवी, अशी अपेक्षा फलटणकरांकडून केली जात आहे.
पाण्यात बुडून आठ वर्षीय मुलाचा मृत्यू |
सातार्यातून युवक बेपत्ता |
निकालावर समाधानी नाही; सरकार पक्षाने अपिलात जावे |
सातारा येथे गजानन महाराज मूर्ती प्राणप्रतिष्ठापनेचा वर्धापन दिन सोहळा |
डॉ. नरेंद्र दाभोलकर खून खटला |
गावदेव मिरवणुकीत जुन्या भांडणाच्या कारणावरून दोन गटांत धुमश्चक्री |
साताऱ्यात पाणीपुरवठ्याचा व्हॉल्व्हला गळती |
सिव्हील हॉस्पिटलच्या पार्कींगमधून दुचाकीची चोरी |
मारहाण प्रकरणी परस्परविरोधी तक्रारी |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा |
सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा |
आर्थिक फसवणूक प्रकरणी दोघांवर गुन्हा |
सराईत गुन्हेगारांकडून पाच घरफोडीचे गुन्हे उघड; 35 तोळे सोन्याचे दागिने हस्तगत |
आर्ट इन मुव्हजतर्फे साताऱ्यात उद्यापासून महिलांसाठी नृत्य कार्यशाळा |
मोदींचा आत्मविश्वास आता गायब झालाय : खासदार शरद पवार |
गावदेव मिरवणुकीत जुन्या भांडणाच्या कारणावरून दोन गटांत धुमश्चक्री |
साताऱ्यात पाणीपुरवठ्याचा व्हॉल्व्हला गळती |
सिव्हील हॉस्पिटलच्या पार्कींगमधून दुचाकीची चोरी |
मारहाण प्रकरणी परस्परविरोधी तक्रारी |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा |
सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा |
आर्थिक फसवणूक प्रकरणी दोघांवर गुन्हा |
सराईत गुन्हेगारांकडून पाच घरफोडीचे गुन्हे उघड; 35 तोळे सोन्याचे दागिने हस्तगत |
आर्ट इन मुव्हजतर्फे साताऱ्यात उद्यापासून महिलांसाठी नृत्य कार्यशाळा |
मोदींचा आत्मविश्वास आता गायब झालाय : खासदार शरद पवार |
स्पर्धेच्या युगात आत्मविश्वासाने उभी राहिलेली पिढी तयार करावी लागेल |
भाऊसाहेब महाराजांच्या जयंतीनिमित्त सातारा, जावलीत भव्य भजन स्पर्धा |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
बॉम्बे रेस्टॉरंट परिसरातून महिला बेपत्ता |
रयत शिक्षण संस्थेमार्फत 9 मे रोजी ‘कर्मवीर पुण्यतिथी’ कार्यक्रमाचे आयोजन |