09:25pm | Mar 23, 2024 |
सातारा : सातारा वाहतूक शाखेने शहरात फटाके फोडणार्या बुलेटवर कारवाया करण्याचा सपाटा लावला असून याद्वारे जप्त करण्यात आलेले सायलेन्सर, प्रेशर हॉर्न्स यावरुन आज वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजीत यादव यांच्या मार्गदर्शनाखाली बुलडोझर फिरवण्यात आला.
सातारा शहर हे शांतताप्रिय शहर म्हणून महाराष्ट्रात ओळखले जाते. मात्र काही तरुणाईमुळे या शहराची शांतता धोक्यात येत होती. बुलेटला फटाके फोडणारे सायलेन्सर बसवणे, प्रेशर हॉर्न्स याबरोबरच काहींनी पोलिसांच्या सायरन सारखे हॉर्न बसवले होते. त्यामुळे शहरातील शांततेला गालबोट लागत होते. याबाबत सातारा शहरातील अनेक नागरिकांनी वाहतूक शाखेकडे तक्रारीही केल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजीत यादव यांनी आपल्या संपूर्ण टीमला अशा वाहनांवर कारवाया करण्याच्या सक्त सूचना दिल्या होत्या.
त्यानुसार वाहतूक शाखेने 56 पेक्षा अधिक वाहनांवर कारवाया करुन 56 सायलेन्सर, 10 पोलीस सायरनसारखे आवाज करणारे हॉर्न्स, 5 पेक्षा जास्त प्रेशर हॉर्न्स जप्त केले. या जप्त केलेल्या मालाला सातार्यात पहिल्यांदाच बुलडोझरखाली चिरडून निरुपयोगी करण्यात आले. या कारवाईमुळे सातारा शहरवासियांनी वाहतूक शाखेचे अभिनंदन केले आहे.
याबाबत बोलताना वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजीत यादव म्हणाले, सातारा शहरात नियमांचे उल्लंघन, वाहनांना मॉडिफाय करण्याच्या नावाखाली वाहनाचा आवाज बदलणे, रेसिंग लावणे अशी कृत्ये आढळून आल्यास दिवसाच नाहीतर रात्रीही वाहतूक शाखा अशा वाहनांवर कायम कारवाई करणार आहे.
महाराष्ट्रात पवार गट शून्य होणार |
सुरेल आवाजातील श्रीराम गीतांनी सातारकर मंत्रमुग्ध |
गुंडगिरी पोसणाऱ्यांना निवडणुकीत धडा शिकवा |
अमित शहा नसते तर सहकारी कारखाने बुडले असते |
कथीत थोर नेत्याकडून जनतेच्या हाती वाडगं |
खर्च निरीक्षक यांच्या उपस्थितीत झाली उमेदवारांची निवडणूक खर्चाची प्रथम तपासणी |
सातारा जिल्ह्यात सेंद्रीय शेतीला गती द्या : जिल्हाधिकारी डुडी |
आचारसंहितेचा भंग होत असल्यास 1950 क्रमांकावर संपर्क साधावा |
उदयनराजे भोसले यांचा मेंढोशी येथील मेळाव्यात विरोधकांना खोचक सल्ला |
घाणबी विभागात मोबाईल टॉवर उभारणार! |
पेठशिवापूर येथे निधी कमी पडू देणार नाही : उदयनराजे भोसले |
बेकायदा दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
संशयास्पद वस्तू जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
मधमाशांच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू |
एलसीबीच्या कोंबिंग ऑपरेशन मध्ये सातार्यात दोन पिस्टल जप्त |

जिल्ह्यातील दोन पोलीस अधिकार्यांसह 11 जणांना महासंचालक सन्मानचिन्ह |
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |