सातारा : काळेश्वरी क्षेत्र कुसूंबी गावचे सुपुत्र ओमकार याने लहान पणापासून पाहिलेले डॉक्टर बनण्याचे स्वप्न आता सत्यात उतरत आहे. आज आयएएस ओमकार पवार नंतर ओमकार कुडवे. दोघेही ओंकार आणि दोघांनाही शैक्षणिक परीक्षेत मिळालेले यश. त्यामागे त्याने केलेले अथक प्रयत्न आणि त्याच्या या यशाला गवसणी मिळण्याकरिता त्याच्या कुटुंबीयांनी दिलेला श्रम आधार. वडील गवंडी काम करतात तर आई घरकाम मोलमजुरी करते.त्या दोघांनी कधी त्याला आर्थिक अडचण न येऊ देता अभ्यासावर लक्ष केंद्रित करावयास लावले आणि कुसुंबीच्या या वाघाने जावली तालुक्यातील नीट परीक्षेतील रेकॉर्ड ब्रेक केला आणि डॉक्टरसाठी आपले ऍडमिशन कन्फर्म करून टाकले.
यासाठी ओमकार ने अथक परीश्रम केले त्याला कोणत्याही प्रकारचा खाजगी क्लास लावला नव्हता तशी त्याची आर्थिक परिस्थिती देखील नव्हती. ज्यावेळी इतर विद्यार्थी मोठ्या मोठ्या क्लासमध्ये जाऊन लाखो रुपये खर्च करून नीट एक्झाम ची तयारी करत होते त्यावेळी त्या नीट चा एक्झाम चा अभ्यास करण्यासाठी या पट्ट्याने ऑनलाइन मोबाईलवर अभ्यास केला त्या मोबाईलचा देखील डिस्प्ले खराब होता पण त्याची साधी तक्रार देखील त्यानी केली नाही आणि चौदा तास अभ्यास करत नीट परीक्षेत 720 पैकी 687 मार्क त्यांनी मिळवत देशात नंबर मिळवलेला आहे.
त्याच्या पुढील कारकीर्दीस आणि डॉक्टर होन्याच्या त्याच्या स्वप्ना ला आता यश मिळणार असून त्याच्या या यशाचे खूप खूप अभिनंदन होत आहे. एका गरिब कुटुंबातील मुलाने चांगलेच यश संपादन केले असून त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. सर्वच सामाजिक स्तरातुन त्याचे अभिनंदन होत आहे. तो सातारा येथील शाहू अकॅडमी चा विद्यार्थी होता. ओमकार तसा हुशार त्याला शिक्षणाची खुप आवड आहे व त्याचा आवडता खेळ क्रिकेट परंतु क्रिकेटला बाजुला ठेवुन त्याने डॉक्टर बनण्याचे स्वप्न उराशी बाळगून केलेली मेहनत आज सार्थकी ठरली आहे. ओमकारचे जावलीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले कुसुंबी चे सरपंच बापू चिकने, ग्रामपंचायत सदस्य कुसुंबी व ग्रामस्थ कुसुंबी यांनी हार्दीक अभिनंदन केले आणि शुभेच्छा दिल्या.
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |
मोबाईल चोरणारी अल्पवयीन टोळी जेरबंद |
सैदापूर येथून एकजण बेपत्ता |
सार्वजनिक बांधकाम विभागाला टाळे ठोकणार |
मुसळधार पावसामुळे सातार्यात दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ |