11:28am | Mar 25, 2024 |
सातारा : धनगरवाडी उपसा सिंचन योजनेचे टप्पा क्र. १ ची योजनेची स्थापत्य कामे अंतिम टप्प्यात असुन विद्युत विभागाकडून बसडक्ट चे काम प्रगतीपथावर आहे. विद्युत वाहिनी रेल्वे क्रॉसिंगचे कामास या आठवाड्यात मंजुरी मिळणे अपेक्षित आहे तसेच हेळगाव व कालगाव येथील कळयंत्र आवाराचे काम विद्युत विभागाकडुन जुन-२०२४ अखेर पुर्ण करण्याचे नियोजित आहे. यांत्रिकी विभागाकडून पंप व पॅनेल पुरवठा पूर्ण असुन बसविणेचे काम तसेच जलाघात उपकरण बसविणेचे काम जुन-२०२४ अखेर पुर्ण करण्याचे नियोजित आहे, अशी माहिती सातारा पाटबंधारे प्रकल्प मंडळाचे सहा. अधीक्षक अभियंता सं.ग. माने यांनी दिली आहे.
सदर योजनेचा टप्पा क्र. १ मधील वितरण व्यवस्थेचे काम ९०% पुर्ण असून सदर टप्पा कार्यान्वित करण्यासाठी वनविभागाच्या हद्दितील वितरण हौदाचे काम करण्यास वनविभागाची मंजुरी मागील आठवड्यात मिळाली आहे. सदरचे काम प्रगतीपथावर आहे. टप्पा क्र. १ चे स्थापत्य, यांत्रीकी व विद्युत काम सप्टेंबर २०२४ अखेर पुर्ण करणेचे नियोजित आहे.
सदर योजनेच्या टप्पा क्र. २ मधील वितरण व्यवस्थेचे काम ८५% पुर्ण असुन सदर टप्पा कार्यान्वित करण्यासाठी वनविभागाच्या हद्दीतील गायकवाडवाडी, घोलपवाडी, निगडी, पाडळी व गोसावेवाडी येथील पाईपलाईनचे काम करण्यास वनविभागाची मंजुरी मागील आठवड्यात मिळाली आहे. सदरचे काम प्रगतीपथावर आहे. सदर टप्प्यातील पंपगृह क्र. २ चे काम पुर्ण करण्यास ०.६९ हे. जमीन खाजगी वाटाघाटीने संपादीत करण्यासाठीचा प्रस्ताव उपविभागीय अधिकारी कराड यांचेकडून मागील आठवड्यात सादर करणेत आले आहे. सदरचे प्रस्ताव मंजुर होताच भूसंपादन प्रक्रिया पूर्ण करुन टप्पा क्र. २ चे काम पुर्ण करुन डिसेंबर २०२४ अखेर सिंचन क्षमता निर्मितीचे नियोजन आहे, असेही सह. अधीक्षक अभियंता माने यांनी कळविले आहे.
महाराष्ट्रात पवार गट शून्य होणार |
सुरेल आवाजातील श्रीराम गीतांनी सातारकर मंत्रमुग्ध |
गुंडगिरी पोसणाऱ्यांना निवडणुकीत धडा शिकवा |
अमित शहा नसते तर सहकारी कारखाने बुडले असते |
कथीत थोर नेत्याकडून जनतेच्या हाती वाडगं |
खर्च निरीक्षक यांच्या उपस्थितीत झाली उमेदवारांची निवडणूक खर्चाची प्रथम तपासणी |
सातारा जिल्ह्यात सेंद्रीय शेतीला गती द्या : जिल्हाधिकारी डुडी |
आचारसंहितेचा भंग होत असल्यास 1950 क्रमांकावर संपर्क साधावा |
उदयनराजे भोसले यांचा मेंढोशी येथील मेळाव्यात विरोधकांना खोचक सल्ला |
घाणबी विभागात मोबाईल टॉवर उभारणार! |
पेठशिवापूर येथे निधी कमी पडू देणार नाही : उदयनराजे भोसले |
बेकायदा दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
संशयास्पद वस्तू जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
मधमाशांच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू |
एलसीबीच्या कोंबिंग ऑपरेशन मध्ये सातार्यात दोन पिस्टल जप्त |
खर्च निरीक्षक यांच्या उपस्थितीत झाली उमेदवारांची निवडणूक खर्चाची प्रथम तपासणी |
सातारा जिल्ह्यात सेंद्रीय शेतीला गती द्या : जिल्हाधिकारी डुडी |
आचारसंहितेचा भंग होत असल्यास 1950 क्रमांकावर संपर्क साधावा |
उदयनराजे भोसले यांचा मेंढोशी येथील मेळाव्यात विरोधकांना खोचक सल्ला |
घाणबी विभागात मोबाईल टॉवर उभारणार! |
पेठशिवापूर येथे निधी कमी पडू देणार नाही : उदयनराजे भोसले |
बेकायदा दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
संशयास्पद वस्तू जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
मधमाशांच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू |
एलसीबीच्या कोंबिंग ऑपरेशन मध्ये सातार्यात दोन पिस्टल जप्त |
जिल्ह्यातील दोन पोलीस अधिकार्यांसह 11 जणांना महासंचालक सन्मानचिन्ह |
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |