09:24pm | Mar 23, 2024 |
सातारा : राष्ट्रवादी पश्चिम महाराष्ट्र औद्योगिक सेलच्या विभागीय कार्याध्यक्षपदी नितीन रामचंद्र शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सातारा जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजला जातो. येथे यशवंत विचारांना मानणारा मोठा गट सक्रिय आहे. राष्ट्रवादीने प्रथमपासूनच सातार्यावर भक्कमपणे पकड ठेवली असून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे संपूर्ण लक्ष हे सातार्यातील राजकारणावर प्रथमपासूनच राहिले आहे. अजित पवार यांच्याकडून नेहमीच पदाधिकारी-कार्यकर्त्यांना ताकद देण्याचे काम होत असते. तसेच त्यांची जिल्ह्यातील प्रत्येक बारीक-सारीक बाबींवरही लक्ष असते.
सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादी अजित पवार गट अधिक जोमाने निवडणुकीच्या प्रचारात कार्यरत आहेच. परंतू त्याला अधिक बळकटी देण्यासाठी राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष अमित कदम यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकाधिक कार्यकर्ते राष्ट्रवादीच्या झेंड्याखाली एकवटत आहेत. त्यातूनच राष्ट्रवादी पश्चिम महाराष्ट्र औद्योगिक सेलच्या विभागीय कार्याध्यक्षपदी बेलवडे, ता. जावली गावचे सुपूत्र नितीन रामचंद्र शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. एका कार्यक्रमात राष्ट्रवादी औद्योगिक सेलचे महाराष्ट्र अध्यक्ष सुभाष मालपाणी यांनी शिंदे यांची पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष म्हणून निवड केली आहे.
नितीन शिंदे यांनी याआधी दलित महासंघाचे जिल्हाध्यक्षपद, त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीच्या जिल्हा खजिनदार पदावर अत्यंत जबाबदारीने काम केले आहे. त्यांची काम करण्याची तळमळ पाहून खा.श्री.छ. उदयनराजे यांनी त्यांची राजे प्रतिष्ठानच्या महाराष्ट्र कार्याध्यक्षपदी निवड केली. त्यानंतर आज त्यांची राष्ट्रवादी पश्चिम महाराष्ट्र औद्योगिक सेलच्या विभागीय कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
या निवडीबाबत बोलताना नितीन शिंदे म्हणाले, राष्ट्रवादीचे काम मी याआधीपासूनच करीत होतो. मात्र, आता अजितदादा पवार यांची खंबीर साथ, अमित कदम यांचे बहुमोल मार्गदर्शन मिळत असल्यामुळे सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादीचे यशवंत विचार घरा-घरांत पोहोचविण्यासाठी आणि पक्षवाढीबरोबरच औद्योगिक क्षेत्रात राष्ट्रवादीला बळकटी देण्याचे काम करणार आहे.
नितीन शिंदे यांना नियुक्तीपत्र देताना राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सातारा जिल्हा कार्याध्यक्ष अमित कदम, राष्ट्रवादीचे सरदार (सागर) भोगांवकर, सातारा तालुका उपाध्यक्ष सनी काटे, जिल्हा सह सरचिटणीस संदीप भोसले, औद्योगिक सेलचे जिल्हाध्यक्ष प्रेमराज शिंदे, सामाजिक न्याय सेल चे भालचंद्र बनसोडे, आदित्य जगताप, जावली तालुकाध्यक्ष साधू चिकणे, सातारा तालुकाध्यक्ष शशिकांत वाईकर, ॲड बाळासाहेब बाबर, लोकजनशक्ती पार्टीचे करन गायकवाड तसेच पदाधिकारी उपस्थित होते.
या निवडीबद्दल नितीन शिंदे यांची विविध क्षेत्रातील मान्यवरांनी प्रत्यक्ष भेट घेवून तसेच भ्रमणध्वनीद्वारे त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
महाराष्ट्रात पवार गट शून्य होणार |
सुरेल आवाजातील श्रीराम गीतांनी सातारकर मंत्रमुग्ध |
गुंडगिरी पोसणाऱ्यांना निवडणुकीत धडा शिकवा |
अमित शहा नसते तर सहकारी कारखाने बुडले असते |
कथीत थोर नेत्याकडून जनतेच्या हाती वाडगं |
खर्च निरीक्षक यांच्या उपस्थितीत झाली उमेदवारांची निवडणूक खर्चाची प्रथम तपासणी |
सातारा जिल्ह्यात सेंद्रीय शेतीला गती द्या : जिल्हाधिकारी डुडी |
आचारसंहितेचा भंग होत असल्यास 1950 क्रमांकावर संपर्क साधावा |
उदयनराजे भोसले यांचा मेंढोशी येथील मेळाव्यात विरोधकांना खोचक सल्ला |
घाणबी विभागात मोबाईल टॉवर उभारणार! |
पेठशिवापूर येथे निधी कमी पडू देणार नाही : उदयनराजे भोसले |
बेकायदा दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
संशयास्पद वस्तू जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
मधमाशांच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू |
एलसीबीच्या कोंबिंग ऑपरेशन मध्ये सातार्यात दोन पिस्टल जप्त |
खर्च निरीक्षक यांच्या उपस्थितीत झाली उमेदवारांची निवडणूक खर्चाची प्रथम तपासणी |
सातारा जिल्ह्यात सेंद्रीय शेतीला गती द्या : जिल्हाधिकारी डुडी |
आचारसंहितेचा भंग होत असल्यास 1950 क्रमांकावर संपर्क साधावा |
उदयनराजे भोसले यांचा मेंढोशी येथील मेळाव्यात विरोधकांना खोचक सल्ला |
घाणबी विभागात मोबाईल टॉवर उभारणार! |
पेठशिवापूर येथे निधी कमी पडू देणार नाही : उदयनराजे भोसले |
बेकायदा दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
संशयास्पद वस्तू जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
मधमाशांच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू |
एलसीबीच्या कोंबिंग ऑपरेशन मध्ये सातार्यात दोन पिस्टल जप्त |
जिल्ह्यातील दोन पोलीस अधिकार्यांसह 11 जणांना महासंचालक सन्मानचिन्ह |
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |