सातारा : सातारा रनर्स फौंडेशनची १२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवार, २२ मार्च रोजी संपन्न झाली.
या सभेत २०२४ सालच्या संयोजन समितीच्या पदाधिकाऱ्यांची एकमताने निवड करण्यात आली. अध्यक्षपदी डॉ. अदिती चंद्रशेखर घोरपडे तसेच उपाध्यक्ष आर्किटेक्ट उपेंद्र पंडित व सेक्रेटरी विशाल ढाणे यांची निवड करण्यात आली. स्पर्धेचे रेस डायरेक्टर म्हणून अभिषेक भंडारी यांची पुनर्नियुक्ती करण्यात आली. या निवडीबद्दल सर्व सभासदांनी त्यांचे अभिनंदन करून त्यांच्या कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी बोलताना गतवर्षीचे अध्यक्ष जितेंद्र भोसले यांनी ही स्पर्धा यशस्वी होण्यामध्ये सातारा रनर्स फौंडेशनच्या सर्वच सदस्यांचा मोलाचा वाटा आहे, असे नमूद केले. त्याचबरोबर सामान्य सातारकर नागरिक, जिल्हा प्रशासन, पोलीस दल, इलेक्ट्रॉनिक मिडीया व प्रिंट मिडियाचे पत्रकार तसेच लोकप्रतिनिधींचाही भक्कम पाठिंबा या स्पर्धेला असतो. याशिवाय सातारा जिल्ह्यातील विविध सामाजिक संघटना, स्वयंसेवी संस्था, शिक्षण संस्था यांचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते हे निष्ठावान स्वयंसेवक म्हणून आपल्या स्पर्धेत अतिशय महत्वाची भूमिका बजावून मोलाचे सहकार्य करतात. या सर्वांच्या पाठिंब्यामुळे व सक्रिय सहभागामुळे ही स्पर्धा आजवर यशस्वी होत आहे, याबद्दल कृतज्ञतेची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली. गेल्या वर्षीच्या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक म्हणून "जय बालाजी ग्रुप" यांनी अतिशय मोलाचे सहकार्य केल्याबद्दल त्यांचे आभार जितेंद्र भोसले यांनी मानले.
रेस डायरेक्टर अभिषेक भंडारी यांनी गेल्या वर्षीचा स्पर्धेचा सविस्तर अहवाल सादर केला. तसेच सन २०२४ या वर्षाचे अंदाजपत्रक सादर केले.
संस्थापक अध्यक्ष डॉ. संदीप काटे यांनी या वर्षीच्या स्पर्धेची माहिती दिली. यावेळी बोलताना ते म्हणाले की स्पर्धेचे हे १३ वे पर्व असून या वर्षी ही स्पर्धा रविवार, दिनांक १ सप्टेंबर २०२४ रोजी होणार असून, स्पर्धेचा एक्स्पो हा शुक्रवार, दिनांक ३० आणि शनिवार दिनांक ३१ ऑगस्ट २०२४ रोजी शेंद्रे येथील कै. अभयसिंहराजे भोसले सांस्कृतिक सभागृहात आयोजित केला आहे. मेडिकल डायरेक्टर डॉ. प्रतापराव गोळे यांनी देखील या सभेत मनोगत व्यक्त केले. दरवर्षीप्रमाणे याही वेळेस स्पर्धेमधील सर्व स्वयंसेवकांना सीपीआर प्रशिक्षण देण्यात येईल. एखादा स्पर्धक स्पर्धेत धावताना पडला तर त्याला तात्काळ वैद्यकीय मदत मिळेपर्यंत प्रथमोपचार कसा करायचा, या संबंधी अवगत करण्यात येईल.
ज्या स्पर्धकांचे आधारकार्ड हे सातारा जिल्ह्यातील आहे त्यांना स्थानिक धावपटू असे समजण्यात येईल आणि ज्यांचे आधारकार्ड सातारा जिल्ह्यातील नसेल त्यांना बाहेरील धावपटू समजण्यात येईल. स्थानिक स्पर्धकांना स्पर्धेमध्ये प्राधान्य देणार आहोत. तसेच त्यांना फीमध्ये सवलत असणार आहे.
या स्पर्धेची ऑनलाईन नोंदणी करताना प्रत्येक स्पर्धकाने आपल्या रहिवासी दाखल्यासाठी आपले आधारकार्ड हे अपलोड करणे आवश्यक आहे. स्पर्धेच्या नोंदणीसाठी एका ई-मेल वरून एकच नोंदणी करता येईल. अधिक माहितीसाठी www.runsatara.com या आमच्या संकेतस्थळाला भेट द्यावी.
नावनोंदणी केलेल्या धावपटूंसाठी दरवर्षीप्रमाणे १६ आठवड्याचा (Long Run) प्रशिक्षण कार्यक्रम देखील आयोजित केला असून हे प्रशिक्षण दिनांक १२ मे पासून पोलीस परेड ग्राउंड, सातारा येथे सकाळी ५.४५ वाजता सुरु होईल, असे यावेळी बोलताना डॉ संदीप काटे यांनी सांगितले.
याप्रसंगी माजी अध्यक्ष अॕड. कमलेश पिसाळ यांचा महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या "सेक्रेटरी" पदी निवड झाल्याबद्दल सर्व सभासदांच्या वतीने सत्कार करण्यात आला. सेक्रेटरी डॉ. रंजिता गोळे यांनी सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले.
या सभेला डॉ चंद्रशेखर घोरपडे, डॉ प्रतापराव गोळे, डॉ पल्लवी पिसाळ, डॉ सुचित्रा काटे, डॉ अविनाश शिंदे, डॉ देवदत्त देव, डॉ. अश्विनी देव, शैलेश ढवळीकर, डॉ अजय शेडगे, डॉ महेश विभुते, मंगेश वाडेकर आदी बहुसंख्य सभासद उपस्थित होते.
गतवर्षी प्रमाणे याही वेळेस प्री रजिस्ट्रेशन आणि फायनल रजिस्ट्रेशन अशा दोन टप्प्यात स्पर्धेचे रजिस्ट्रेशन ऑनलाइन पध्दतीने होणार आहे. रजिस्ट्रेशनचा पहिला टप्पा म्हणजे प्री रजिस्ट्रेशन हा दिनांक ३ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ६.०० वाजता सुरु होणार असून दिनांक ७ एप्रिल २०२४ रोजी सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत तो खुला असणार आहे. यामध्ये स्पर्धकाने आपले नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक, ई-मेल, टी शर्ट साईझ, स्त्री / पुरुष, वय, जन्मतारीख इत्यादी तपशील भरायचा आहे. प्री रजिस्ट्रेशन करतेवेळी फक्त वरील सर्व माहिती भरायची आहे, या टप्प्यावर पैसे भरायचे नाहीत. प्री रजिस्ट्रेशन झाल्यावर तुमच्या ई मेल आयडी वर एक कोड येईल, हा कोड म्हणजे तुमचा फायनल रजिस्ट्रेशनसाठीचा पास असणार आहे. ज्या स्पर्धकांनी प्री रेजिस्ट्रेशन केलं आहे फक्त त्यांनाच दुसऱ्या टप्प्यात दि १० एप्रिल रोजी रजिस्ट्रेशन फी भरून स्पर्धेचे फायनल रजिस्ट्रेशन करण्याची संधी मिळेल. मात्र प्रवेश संख्येवर मर्यादा असल्यामुळे जागा उपलब्ध असेपर्यंतच ही संधी मिळेल याची नोंद घ्यावी.
महाराष्ट्रात पवार गट शून्य होणार |
सुरेल आवाजातील श्रीराम गीतांनी सातारकर मंत्रमुग्ध |
गुंडगिरी पोसणाऱ्यांना निवडणुकीत धडा शिकवा |
अमित शहा नसते तर सहकारी कारखाने बुडले असते |
कथीत थोर नेत्याकडून जनतेच्या हाती वाडगं |
खर्च निरीक्षक यांच्या उपस्थितीत झाली उमेदवारांची निवडणूक खर्चाची प्रथम तपासणी |
सातारा जिल्ह्यात सेंद्रीय शेतीला गती द्या : जिल्हाधिकारी डुडी |
आचारसंहितेचा भंग होत असल्यास 1950 क्रमांकावर संपर्क साधावा |
उदयनराजे भोसले यांचा मेंढोशी येथील मेळाव्यात विरोधकांना खोचक सल्ला |
घाणबी विभागात मोबाईल टॉवर उभारणार! |
पेठशिवापूर येथे निधी कमी पडू देणार नाही : उदयनराजे भोसले |
बेकायदा दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
संशयास्पद वस्तू जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
मधमाशांच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू |
एलसीबीच्या कोंबिंग ऑपरेशन मध्ये सातार्यात दोन पिस्टल जप्त |
खर्च निरीक्षक यांच्या उपस्थितीत झाली उमेदवारांची निवडणूक खर्चाची प्रथम तपासणी |
सातारा जिल्ह्यात सेंद्रीय शेतीला गती द्या : जिल्हाधिकारी डुडी |
आचारसंहितेचा भंग होत असल्यास 1950 क्रमांकावर संपर्क साधावा |
उदयनराजे भोसले यांचा मेंढोशी येथील मेळाव्यात विरोधकांना खोचक सल्ला |
घाणबी विभागात मोबाईल टॉवर उभारणार! |
पेठशिवापूर येथे निधी कमी पडू देणार नाही : उदयनराजे भोसले |
बेकायदा दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
संशयास्पद वस्तू जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
मधमाशांच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू |
एलसीबीच्या कोंबिंग ऑपरेशन मध्ये सातार्यात दोन पिस्टल जप्त |
जिल्ह्यातील दोन पोलीस अधिकार्यांसह 11 जणांना महासंचालक सन्मानचिन्ह |
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |