दहिवडी : शेतामध्ये असलेल्या शेततळ्याची नोंद सातबाऱ्यावर करण्यासाठी कुळकजाई येथे नियुक्तीस असलेले तलाठी रोहीत सुधाकर माळी (वय ३२) व गाव कोतवाल मल्हारी उर्फ भगवान हरिबा वायदंडे (वय ४3 वर्षे) ,कुळकजाई ता. माण यांना तीन हजार रुपयाची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले.
याबाबत सविस्तर माहिती अशी कि, तक्रारदार यांच्या शेतामध्ये असलेल्या शेततळ्याची नोंद सातबाऱ्यावर करण्यासाठी तलाठी रोहीत सुधाकर माळी यांनी तक्रारदार यांचेकडे तीन हजार रुपयाची मागणी केली होती. त्यानुसार फिर्यादी यांनी याबाबत सातारा येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यांनंतर ठरल्याप्रमाणे आज रक्कम देण्याचे कबूल केले होते.
त्यानुसार दहिवडी दूरसंचार कार्यालय इमारतीच्या आवारात कोतवाल मल्हारी उर्फ भगवान हरीबा वायदंडे हा तलाठी माळी यांच्या सांगण्यावरुन तीन हजार रुपयाची लाच स्वीकारताना लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी रंगेहात पकड़ले त्यांनंतर तलाठी माळी व कोतवाल वायदंडे यांच्यावर लाचलुचपत विभागाने दहिवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
या घटनेने माण तालुक्यात मोठी खळबळ उडाली असून रात्री उशिरा पर्यंत हि करवाई चालू होती. हि कारवाई उपअधीक्षक सुहास नाडगौड़ा, पोलिस सहा.फौ. आनंदराव सपकाळ, पोलिस हवालदार संभाजी बनसोडे, तेजपाल शिंदे, पो.कॉ. संभाजी काटकर यांनी केली आहे.
सराईत गुन्हेगारांकडून पाच घरफोडीचे गुन्हे उघड; 35 तोळे सोन्याचे दागिने हस्तगत |
आर्ट इन मुव्हजतर्फे साताऱ्यात उद्यापासून महिलांसाठी नृत्य कार्यशाळा |
मोदींचा आत्मविश्वास आता गायब झालाय : खासदार शरद पवार |
स्पर्धेच्या युगात आत्मविश्वासाने उभी राहिलेली पिढी तयार करावी लागेल |
भाऊसाहेब महाराजांच्या जयंतीनिमित्त सातारा, जावलीत भव्य भजन स्पर्धा |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
बॉम्बे रेस्टॉरंट परिसरातून महिला बेपत्ता |
रयत शिक्षण संस्थेमार्फत 9 मे रोजी ‘कर्मवीर पुण्यतिथी’ कार्यक्रमाचे आयोजन |
परशुराम जन्मोत्सवाचे उद्या सातार्यात आयोजन |
बांबूच्या मतदान केंद्राने वाढविला मतदारांचा उत्साह |
आयशर टेम्पो आडवा आल्याने पोलिसांच्या गाडीला अपघात |
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात 'उमेद' ने करून दाखवले |
पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी पतीवर गुन्हा |
शाहूपुरीत सुमारे दीड लाखांची घरफोडी |
खंडणी मागितल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा |

सातारा जिल्ह्यामध्ये 63.07 टक्के मतदान |
उदयनराजे भोसले यांचे सात वाजून सात मिनिटांनी मतदान |
मोठ्या मतांनी शाहू छत्रपती यांचा विजय होईल |
पाण्याच्या टाकीची भिंत अंगावर पडून महिला जागीच ठार |
मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी अज्ञात पिकअप चालकावर गुन्हा |