12:37pm | Dec 06, 2020 |
पुसेगाव : येथील मंगल ग्रुपच्या सर्वेसर्वा माजी जि.प. सदस्या रुक्मिणी कुंडलिकराव जाधव यांच्या प्रेरणेतून पारले प्रोडक्टचे अधिकृत वितरक व मंगल डिस्ट्रिब्यूटरचे सुशांत जाधव, मंगल वस्त्र निकेतनचे मालक सुश्रूतशेठ जाधव या माजी विद्यार्थ्यांच्या दातृत्वातून कोव्हीड 19 जागतिक महामारीमुळे उदभवलेल्या पुरस्थितोमुळे विद्यार्थी आरोग्य सुरक्षित राहण्याकरता स्वयंचलित सॅनेटायजर मशीन तसेच सॅनेटायजर बॉटल भेट देऊन वेगळा आदर्श समाजापुढे ठेवला आहे.
श्री सेवागिरी शिक्षण प्रसारक मंडळ पुसेगावचे अध्यक्ष विश्वनाथराव जाधव, सचिव डॉ. सुरेशराव जाधव, विश्वस्थ व श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे चेअरमन मोहनराव जाधव यांच्याकडे ही मदत आज सुपूर्त करण्यात आली. गरज असणारी मदत करणारे व व्यवसाय सांभाळत समाजासाठी आपले योगदान देणारे जाधव कुटंबीय व त्यांचे कार्य प्रेरणादायी आहे. समाजाला अशा दानशूर व्यक्तींची गरज आहे. कोव्हीड 19 जागतिक महामारीमूळे आपण सर्वांनीच मास्क, सॅनेटायजर इ. चा योग्य वापर करावा. तसेच आरोग्याची काळजी घ्यावी असे विचार संस्था सचिव डॉ.सुरेशराव जाधव यांनी यावेळी मांडले.
कार्यकमास माजी जि.प.सदस्या रुक्मीणी जाधव, अध्यक्ष विश्वनाथराव जाधव, संस्था सचिव डॉ.सुरेशराव जाधव, श्री सेवागिरी देवस्थानचे चेअरमन मोहनराव जाधव, प्राचार्य डी.बी.काळे, पर्यवेक्षक एस.व्ही. माने, एस.एस.जाधव यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. संजय जाधव यांनी स्वागत केले. मोहनराव गुरव यांनी सूत्रसंचालन केले.
पाण्यात बुडून आठ वर्षीय मुलाचा मृत्यू |
सातार्यातून युवक बेपत्ता |
निकालावर समाधानी नाही; सरकार पक्षाने अपिलात जावे |
सातारा येथे गजानन महाराज मूर्ती प्राणप्रतिष्ठापनेचा वर्धापन दिन सोहळा |
डॉ. नरेंद्र दाभोलकर खून खटला |
गावदेव मिरवणुकीत जुन्या भांडणाच्या कारणावरून दोन गटांत धुमश्चक्री |
साताऱ्यात पाणीपुरवठ्याचा व्हॉल्व्हला गळती |
सिव्हील हॉस्पिटलच्या पार्कींगमधून दुचाकीची चोरी |
मारहाण प्रकरणी परस्परविरोधी तक्रारी |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा |
सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा |
आर्थिक फसवणूक प्रकरणी दोघांवर गुन्हा |
सराईत गुन्हेगारांकडून पाच घरफोडीचे गुन्हे उघड; 35 तोळे सोन्याचे दागिने हस्तगत |
आर्ट इन मुव्हजतर्फे साताऱ्यात उद्यापासून महिलांसाठी नृत्य कार्यशाळा |
मोदींचा आत्मविश्वास आता गायब झालाय : खासदार शरद पवार |

स्पर्धेच्या युगात आत्मविश्वासाने उभी राहिलेली पिढी तयार करावी लागेल |
भाऊसाहेब महाराजांच्या जयंतीनिमित्त सातारा, जावलीत भव्य भजन स्पर्धा |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
बॉम्बे रेस्टॉरंट परिसरातून महिला बेपत्ता |
रयत शिक्षण संस्थेमार्फत 9 मे रोजी ‘कर्मवीर पुण्यतिथी’ कार्यक्रमाचे आयोजन |