सातारा : जिल्ह्यात तीन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातात जखमी केल्याप्रकरणी चौघांवर संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 26 जून रोजी साडेआठ वा. सुमारास पारगाव, ता. खंडाळा गावच्या हद्दीत पुणे-सातारा महामार्गावर केसुर्डी पुलाच्या उतारावर महंमद समीर मालपाशा (रा. बागवान गल्ली, निपाणी, ता. चिकोडी) हे आपल्या ताब्यातील ट्रक क्र. केए 23 बी 1893 अत्यंत हयगयीने, निष्काळजीपणाने चालवित असल्याचे निदर्शनास आले. ट्रकने सचिन बाळकृष्ण काळे यांच्या दुचाकीला पाठिमागून धडक देवून त्याला गंभीर जखमी केल्याची तक्रार खंडाळा पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
दुसर्या घटनेत दि. 28 जून रोजी साडेपाच वा. सुमारास पेरले, ता. कराड गावच्या हद्दीत पुणे-बेंगलोर महामार्गावर मिस्टर इडली हॉटेल समोर शाहनवाज बादशहा शेख (रा. टॉवर कॉलनी, सह्याद्रि नगर, सांगली) याने आपल्या ताब्यातील ट्रक क्र. एमएच 08 डब्ल्यू 8483 हा महामार्गावर साईडपट्टीवर दुसर्याच्या जिविताला धोका निर्माण होईल, अशा पद्धतीने उभा केला होता. दरम्यान महंमद लतिफ पठाण (वय 36, रा. मुजावर कॉलनी, कराड) याने आपल्या ताब्यातील ट्रॅव्हल्स क्र. एमएच 09 ईएम 4302 ही भरधाव वेगाने निष्काळजीपणाने चालवून ट्रकला पाठिमागून धडक दिली. या अपघातात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले असून याबाबत पोलीस हवा. दीपक जाधव यांनी उंब्रज पोलीस ठाण्यात दोघांविरोधात तक्रार दाखल केली आहे.
तिसर्या घटनेत दि. 23 रोजी 10 वा. सुमारास बोरगाव ता. कोरेगाव गावच्या हद्दीत दत्त मंदीर चौकात सुनिल जगन्नाथ ननावरे (रा. बोरगाव) हे आपल्या ताब्यातील दुचाकी क्र. एमएच 11 डब्लूं 8510 वरुन सुर्ली येथून बोरगाव कडे जात असताना दुचाकी निष्काज़ीपणाने चालवत होते. रस्ता ओलांडत असताना न थांबता निलेश चव्हाण यांच्या दुचाकीला जोराची धडक दिल्याने चव्हाण हे गंभीर जखमी होवून त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याची तक्रार पो. हवा. ज्योतिराम भुजबळ यांनी रहिमतपूर पोलीस ठाण्यात दिली आहे. पो. उप निरीक्षक सावंत तपास करीत आहेत.
जिल्ह्यात 5105 पाणी स्त्रोतांची तपासणी |
आयुर्वेदिक गार्डनचा वॉकिंग ट्रॅक सुरू करण्याची मागणी |
तरुणांनी उद्योगविश्वात गरुड झेप घ्यावी |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
एकास मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा |
अपघात प्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा |
बांधकाम साहित्याची चोरी करणारी सराईत टोळी गजाआड |
वाई अर्बन बँकेच्या निवडणुकीत १५ जागांसाठी ७२ उमेदवारी अर्ज |
सोनी मराठी वरील कोण होणार करोडपतीच्या स्पर्धकांना २ करोड रुपये जिंकण्याची सुवर्णसंधी! |
मेट्रोपोलिस हेल्थकेअरने केले कराड येथे प्रगत निदान चाचणी केंद्र सुरू |
डॉ.बाळकृष्ण दामले यांची संचालक पदी निवड |
पाटणला रविवारी अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचा मेळावा |
तो ऐतिहासिक रांजण अखेर पुरातत्व विभागाकडे जमा |
बोगस नळकनेक्शनची पालिकेकडून शोधमोहीम! |
नियमित कर्जफेड करणाऱ्या 24 हजार शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रकमेची प्रतीक्षा |
अपघात प्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा |
बांधकाम साहित्याची चोरी करणारी सराईत टोळी गजाआड |
वाई अर्बन बँकेच्या निवडणुकीत १५ जागांसाठी ७२ उमेदवारी अर्ज |
सोनी मराठी वरील कोण होणार करोडपतीच्या स्पर्धकांना २ करोड रुपये जिंकण्याची सुवर्णसंधी! |
मेट्रोपोलिस हेल्थकेअरने केले कराड येथे प्रगत निदान चाचणी केंद्र सुरू |
डॉ.बाळकृष्ण दामले यांची संचालक पदी निवड |
पाटणला रविवारी अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचा मेळावा |
तो ऐतिहासिक रांजण अखेर पुरातत्व विभागाकडे जमा |
बोगस नळकनेक्शनची पालिकेकडून शोधमोहीम! |
नियमित कर्जफेड करणाऱ्या 24 हजार शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रकमेची प्रतीक्षा |
साताऱ्यात इयत्ता १२ वीच्या परीक्षेत मुलींची बाजी |
वडूज पंचायत समितीचा विस्तार अधिकारी लाच लुचपतच्या जाळ्यात |
खिडकीचे गज वाकवून लॅपटॉपची चोरी |
रामाचा गोट येथून युवक बेपत्ता |
विरळी येथे युवकाची आत्महत्या |