सातारा : गणेशोत्सवसाठी सुट्टीवर आलेल्या व्याजवाडी (ता. वाई) येथील जवानाने शुक्रवारी दुपारी 4.45 च्या सुमारास सातारा येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.
विजय सुदाम कुदळे (वय 34, सध्या रा. अमरलक्ष्मी, प्रेरणा सोसायटी, सातारा) असे आत्महत्या केलेल्या जवानाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विजय कुदळे हे आयटीबीपीमध्ये सेवेत असून ते सुट्टीवर आले होते. सुट्टी संपवून पुन्हा हजर होण्यासाठी जाण्याच्या तयारीत असताना त्यांनी शुक्रवारी सायंकाळी 4.45 वाजण्याच्या सुमारास साताऱ्यातील अमरलक्ष्मी येथील प्रेरणा सोसायटीमध्ये राहत्या घरात छताच्या हुकाला ओढणीने गळफास घेवून आत्महत्या केली.
दरम्यान, ही घटना त्यांचे साडू भानुदास वाघ यांच्या निदर्शनास आल्यावर त्यांनी कुदळे यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. शवविच्छेदन केल्यानंतर त्यांचे पार्थिव शनिवारी सकाळी व्याजवाडी येथे नेण्यात आले. कुदळे यांच्या निधनामुळे गावावर शोककळा पसरली आहे. यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा असा परिवार आहे.
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |
मोबाईल चोरणारी अल्पवयीन टोळी जेरबंद |
सैदापूर येथून एकजण बेपत्ता |
सार्वजनिक बांधकाम विभागाला टाळे ठोकणार |
मुसळधार पावसामुळे सातार्यात दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ |