01:06pm | Sep 23, 2022 |
दिल्ली : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर चांगली बातमी आहे. देशातील कोरोनाचा आलेख पुन्हा घटला आहे. देशात 5, 383 नवीन रुग्णांची नोंद झाली. ही संख्या आधीच्या दिवसापेक्षा 60 अंकांनी कमी आहे. कोरोना रुग्णांची संख्या महाराष्ट्रासह मुंबईत कमी होताना दिसत आहे. ही दिलासादायक बातमी आहे. कारण अवघ्या काही दिवसांवर नवरात्री आणि त्यानंतर दिवाळी आहे. कोरोनाचा आलेख घटताना दिसतोय. त्यामुळे यंदा सण आणि उत्सव जोरदार उत्साहात साजरे होत आहेत.
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्यात लसीकरणाचा मोठा वाटा आहे. देशव्यापी लसीकरणात आतापर्यंत 217 कोटी लसी देण्यात आल्या आहेत. देशात गेल्या 24 तासांत 5 हजार 383 नवीन कोरोनाबाधित आढळले आहेत. तर गुरुवारी दिवसभरात 20 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या नव्या आकडेवारीनुसार, देशात सध्या 45 हजार 281 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. सक्रिय रुग्णांची संख्या 1,061 ने घटली आहे. काल देशात 46 हजार 342 उपचाराधीन कोरोना रुग्ण होते.
कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.71 टक्के
आणखी एक दिलासादायक बाब म्हणजे देशात नव्याने नोंद झालेल्या कोरोना रुग्णांपेक्षा कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. देशात गेल्या 24 तासांत म्हणजेच गुरुवारी दिवसभरात 6 हजार 424 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. सध्या देशातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.71 टक्के इतके असून कोरोना रुग्ण पॉझिटिव्हीटी रेट 1.68 टक्के आहे. देशात आतापर्यंत कोरोनामुळे एकूण 5 लाख 28 हजार 449 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
मुंबईतही कोरोना रुग्ण घटले : 112 कोरोना रुग्णांची नोंद
कोरोना रुग्णांची संख्या महाराष्ट्रासह मुंबईत कमी होताना दिसत आहे. मुंबईत 112 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे नागरिकांना आता दिलासा मिळाला आहे. मागील काही दिवसांपासून रुग्णसंख्या कमी होतानाचे चित्र पाहायला मिळत आहे. मुंबईत बुधवारी 203 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. ज्यामुळे मुंबईत कोरोनावर मात केलेल्या रुग्णांची संख्या 11,28,776 वर पोहोचली आहे. त्यामुळे मुंबईचा रिकव्हरी रेट 98.2 टक्के इतका झाला आहे. तर मागील 24 तासांत एकाही रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला नाही.
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |
मोबाईल चोरणारी अल्पवयीन टोळी जेरबंद |
सैदापूर येथून एकजण बेपत्ता |
सार्वजनिक बांधकाम विभागाला टाळे ठोकणार |
मुसळधार पावसामुळे सातार्यात दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ |