08:48pm | Jun 18, 2023 |
मायणी : मायणी, ता. खटाव गावच्या हद्दीत मायणी ते विटा जाणार्या रस्त्यावर हॉटेल शिवनेरी येथे जेवण्यासाठी थांबलेल्या सांगली जिल्ह्यातील वाहनधारकाला मारहाण करून लुटमार केल्याप्रकरणी वडूज पोलिसांनी कान्हरवाडी (ता.खटाव) येथील विकास सेवा सोसायटीचा सचिव सुदर्शन सुभाष येलपले (वय 28) याला अटक केली आहे. या गुन्ह्यात यापूर्वी पोलिसांनी दोघांना अटक केली होती. याप्रकरणी रविकिरण बाजीराव काळे (रा. नागराळे,ता.पलुस,जि.सांगली) यांनी दि.11 रोजी फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, फिर्यादी रविकिरण काळे हे दि.10 रोजी रात्री आठ वाजण्याच्यास सुमारास मायणी ते विटा जाणार्या रस्त्याशेजारील असलेल्या हॉटेल शिवनेरी येथे त्यांच्या मित्रांसोबत जेवणासाठी थांबले होते. जेवण केल्यानंतर काळे हे मित्रांसोबत रस्त्याकडेला पार्क केलेल्या त्यांच्या गाडीकडे निघाले होते. त्यावेळी लाल रंगाच्या स्विफ्टमधून आलेल्या अनोळखी तीन तरूणांनी काळे व त्यांच्या मित्रांना मारहाण करण्यास सुरूवात केली होती. त्यानंतर त्यातील एका तरूणाने काळे यांना लोखंडी रॉडने मारहाण करण्यास सुरूवात केली तसेच दुसर्याने त्यांच्या खिशातील रोख 50 हजार जबरदस्तीने काढून घेतले. दरम्यान काळे यांचा मित्र रोहित मलाप्पा दाईंगळे हा चोरट्यांना आडवत असताना तिसर्या चोरट्याने त्याच्या डोक्यात खुर्ची मारून त्यालाही जखमी केल्याची तक्रार फिर्यादी काळे यांनी दि.11 रोजी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास वडूज पोलीस ठाण्यात दिली होती.
गुन्हा दाखल झाल्यानंतर वडूज पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवून मायणी येथील दोन तरूणांना ताब्यात घेवून अटक केली होती. नमुद तरूणांच्याकडे कसून चौकशी केली असता, या प्रकरणाचा मास्टर माईंड हा कान्हरवाडी विकास सेवा सोसायटीचा सचिव सुदर्शन येलपले असल्याचे समोर आले होते. तेव्हापासून पोलीसांचे एक पथक येलपले याच्या पाळतीवर ठेवण्यात आले होते. दरम्यान त्याच्या हालचाली संशयास्पद असल्याने व या लुटमार प्रकरणात त्याचा सहभाग असल्याची खात्री झाल्यानंतर वडूज पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.अश्विनी शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली परिवीक्षाधीन पोलीस उपअधीक्षक अजय कोकाटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल माने यांच्या सूचनांनुसार हवालदार साळुंखे, सत्यवान खाडे, शिंदे यांनी केली.
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |
मोबाईल चोरणारी अल्पवयीन टोळी जेरबंद |
सैदापूर येथून एकजण बेपत्ता |
सार्वजनिक बांधकाम विभागाला टाळे ठोकणार |
मुसळधार पावसामुळे सातार्यात दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ |