09:39pm | Apr 01, 2024 |
सातारा : सातारा पालिकेच्या बदली होऊन गेलेल्या लेखापाल शबनम शेख या अन्यायकारक बदलीमुळे मॅटमध्ये गेल्या होत्या. शबनम शेख यांनी पुन्हा सातारा पालिकेत येऊन लेखापालाच्या खुर्चीमध्ये ठिय्या दिला आहे. मात्र अद्याप त्यांच्याकडे कोणताही कार्यभार देण्यात आला नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
सौर ऊर्जा प्रकल्पाच्या बिलासंदर्भातील फाईल अनाधिकाराने आपल्या ताब्यात ठेवल्याप्रकरणी मुख्याधिकारी अभिजीत बापट व लेखापाल शबनम शेख यांच्यामध्ये शीतयुद्ध पेटले होते. या प्रकरणाचा पालिकेत मोठा गहजब झाला होता. त्यामुळे मुख्याधिकार्यांनी शबनम शेख यांना 11 महिन्यातच एकतर्फी कार्यमुक्त केले होते. मात्र शबनम शेख यांची आस्थापना वित्त विभाग सहाय्यक संचालक वर्ग एक अशी आहे, वित्त विभागाकडून त्यांच्या बदल्या केल्या जातात. मात्र मुख्याधिकार्यांनी त्यांना कार्यमुक्त करण्याचा अहवाल ठेवत पालिकेचा लेखा विभागाचा कार्यभार महेश सावंत यांच्याकडे दिला.
सावंत हे सध्या ऑडिटर आणि लेखापाल अशी दुहेरी जबाबदारी पार पाडत आहेत. मात्र गेल्या चार दिवसापासून शबनम शेख या पुन्हा सातारा पालिकेत हजर झाल्या असून त्या लेखा विभागाच्या खुर्चीवर येऊन बसतात. या अन्यायकारक बदलीच्या विरोधात शेख यांनी मॅटमध्ये धाव घेऊन या संदर्भात याचिका दाखल केली होती. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. त्यामुळे झालेली बदली मान्य करण्यास शेख यांनी नकार देत पुन्हा सातारा पालिकेत हजेरी नोंदवली आहे.
या प्रकारामुळे सातारा पालिका प्रशासनाची अडचण झाली आहे. मात्र शेख यांच्याकडे अद्याप कोणताही कार्यभार देण्यात आला नसल्याचे लेखा विभागाच्या सूत्रांनी सांगितले.
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |
मोबाईल चोरणारी अल्पवयीन टोळी जेरबंद |
सैदापूर येथून एकजण बेपत्ता |
सार्वजनिक बांधकाम विभागाला टाळे ठोकणार |
मुसळधार पावसामुळे सातार्यात दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ |