09:36pm | Feb 10, 2024 |
सातारा : सातारा प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने रस्ते सुरक्षा सप्ताह अंतर्गत शनिवारी वॉकेथॉनच्या माध्यमातून वाहतूक जनजागृती मोहीम राबवण्यात आली. या वॉकेथॉनला सातार्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सुमारे साडेतीनशे महाविद्यालयीन युवक युवतींनी यामध्ये भाग घेतला होता या वॉकेथॉन दरम्यान दुचाकी व चारचाकी चालकांना स्टिकर वाटप करून या मोहिमेची माहिती देण्यात आली.
प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान राबवण्यात आले. सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी संदीप म्हेत्रे यांच्या उपस्थितीत सकाळी आठ वाजता हिरवा झेंडा दाखवून वॉकेथॉनला येथील शाहू स्टेडियम मधून सुरुवात करण्यात आली. यावेळी जिल्हा कोषागार अधिकारी आरती नागरे, जिल्हा क्रीडाधिकारी नितीन तारळकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
या रॅलीमध्ये साडेतीनशे महाविद्यालयीन युवक-युवतींनी भाग घेतला होता. श्री भवानी महाविद्यालय, भवानी विद्यामंदिर, डीजी कॉलेज, छत्रपती शिवाजी कॉलेज या महाविद्यालयाचे विद्यार्थी-विद्यार्थीनी सहभागी झाले होते. या वॉकेथॉनच्या माध्यमातून राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत सुरक्षित वाहतुकीचे महत्त्व पटवून देण्यात आले. हा वॉकेथॉन शाहू स्टेडियम, बस स्टॅन्ड पोवई नाका, प्रादेशिक परिवहन कार्यालय असा काढण्यात आला.
या मोहिमेदरम्यान दुचाकी चालकांना हेल्मेटचे महत्व, वाहनांचा वेग, सुरक्षित उपाययोजना याबाबत त्यांचे प्रबोधन करण्यात आले. तसेच चार चाकी वाहनांना या संदर्भातील स्टिकर चे वाटप करण्यात आले.
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |
मोबाईल चोरणारी अल्पवयीन टोळी जेरबंद |
सैदापूर येथून एकजण बेपत्ता |
सार्वजनिक बांधकाम विभागाला टाळे ठोकणार |
मुसळधार पावसामुळे सातार्यात दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ |