01:09pm | Mar 05, 2024 |
कराड : नही चलेगी नही चलेगी ममता बॅनर्जींकी तानाशाही नही चलेगी, ममता बॅनर्जींचा निषेध असो, भारतीय जनता पार्टीचा विजय असो या ना अशा घोषणा देत पश्चिम बंगालमधील संदेश खाली प्रकरणाचा भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीच्यावतीने कराड (जि. सातारा) येथे भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष व भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्या चित्रा वाघ यांच्या उपस्थितीत निधेष करण्यात आला.
कराड येथील कोल्हापुर नाक्यावर ममता बॅनर्जींचा निषेध करण्यात आला. यावेळी भाजपच्या महिला पदाधिकारी उपस्थित होत्या. चित्रा वाघ म्हणाल्या, पश्चिम बंगाल महिलांसाठी चालता बोलता नरक झाल्याचे दिसत आहे. संदेश खाली मधील घटना या देशाला लाजेने मान खाली घालवणाऱ्या घटना आहेत. पश्चिम बंगालमध्ये महिला मुख्यमंत्री असतानाही महिलांना नागवण्याचे काम केले जात आहे, हे निषेधार्ह्य आहे.
तृणमुल कॉंग्रेसचे, ममता बॅनर्जींचे पदाधिकारी, कार्यकर्ते महिलांवर अत्याचार करत आहेत. संदेश खाली हे तर महिला आत्याचाराच्या हिमनगाचे टोक आहे. भाजपच्या रेट्याने काल संशयीत शहजान खानला अटक करण्यात आली आहे. तो ज्या पध्दतीने चालत होता, त्याची बॉडी लॅग्वेज बघता डाल मे कुछ काला है असे नाही तर पुरी डाल ही काली है अशी स्थिती आहे. शहजान खान हा बांग्लादेशातील आहे.
तेथे १० हजार कोटींचा गरीबांना देण्यात येणाऱ्या रेशनिंगचा घोटाळा त्याने केला आहे. पश्चिम बंगालची एक महिला मंत्री ज्योती प्रिया हीलाही अटक करण्यात आली आहे. शहजान खानला पकडायला गेल्यावर इडीच्या कर्मचाऱ्यांवरही हल्ला करण्यात आला. ५५ दिवस देश आक्रोश करत असताना तेथे महिला मुख्यमंत्री असतानाही त्याला अटक केली गेली नाही. त्याचा आम्ही निषेध करत आहोत.
ज्या पध्दतीने संदेश खाली प्रकरणाचा निषेध करत आहात त्यापध्दतीने मणिपुरच्या घटनेचा भाजपच्या महिला आघाडीकडुन निषेध कऱण्यात आला नाही या प्रश्नावर वाघ म्हणाल्या, मणिपुरच्या घटनेप्रमाणेच राज्यस्थानमध्येही आत्याचार झाले. त्याचाही आम्ही निषेध केला आहे. मणिपुरच्या घटनेवर केंद्र सरकार स्पष्टीकरण द्यायला तयार होते.
मात्र विरोधकांनी सत्यता ऐकून घेण्यास नकार दिला. मणिपुरवर आम्ही नक्की बोललो आहोत. महिलांवर सामुहीक आत्याचार करणाऱ्या आरोपीला ममता बॅनर्जीने ५५ दिवस आरोपीला दडवुन ठेवले. तेथील महिलांच्या अंगावर गुंड सोडण्याचे काम ममता बॅनर्जींच्या सरकारकडुन केले जात आहे. देशात आम्ही हे खपवुन घेणार नाही.
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |
मोबाईल चोरणारी अल्पवयीन टोळी जेरबंद |
सैदापूर येथून एकजण बेपत्ता |
सार्वजनिक बांधकाम विभागाला टाळे ठोकणार |
मुसळधार पावसामुळे सातार्यात दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ |