नवी दिल्ली : अमूल दुधाच्या दरात वाढ झाल्यानंतर मदर डेअरीनेही आता ३ जूनपासून सर्व प्रकारच्या दुधाच्या दरात २ रुपयांनी वाढ केली आहे. ही वाढ आजपासून लागू झाल्याचं मदर डेअरीने म्हटलं आहे.
मदर डेअरीने सोमवारी दुधाच्या सुधारित दराची यादी जाहीर केली. यादीनुसार आता लोकांना मदर डेअरीचं बल्क वेंडेड दूध ५२ ऐवजी ५४ रुपये, टोन्ड दूध ५४ ऐवजी ५६ रुपये, गायीचे दूध ५६ ऐवजी ५८ रुपये, फुल क्रीम दुधासाठी ६६ ऐवजी ६८ रुपये मोजावे लागणार आहेत. म्हशीच्या दुधाला ७० ऐवजी ७२ रुपये आणि डबल टोन्ड दुधासाठी ४८ ऐवजी ५० रुपये मोजावे लागणार आहेत.
दुधाचे भाव का वाढले?
दुधाचे दर वाढण्याचं कारण म्हणजे त्यासाठी येणारा खर्च जास्त असल्याचं दुग्ध व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे. कडाक्याच्या उन्हात दूध उत्पादनाचा खर्च वाढला आहे. गाई-म्हशींनी दूध देणे बंद केलं किंवा कमी केलं आहे. या कारणांमुळे कंपन्यांनी दुधाचे दर वाढवले आहेत.
गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशनने सोमवारपासून दुधाच्या दरात दोन रुपयांनी वाढ केली आहे. युनियनने म्हटले आहे की, "एकूण कामकाजाचा खर्च आणि दुधाच्या उत्पादन खर्चात वाढ झाल्यामुळे ही दरवाढ करण्यात आली आहे. आमच्या सदस्य संघटनांनीही गेल्या वर्षभरात शेतकऱ्यांच्या किमतीत सुमारे ६-८ टक्क्यांनी वाढ केली आहे."
अमूलचे दूध २ रुपयांनी महागले
देशातील सर्वात मोठा दूध उत्पादन संघ अमूलने प्रति लीटरमागे दोन रुपयांची वाढ जाहीर केली आहे. गुजरात मिल्क मार्केटिंग फेडरेशन म्हणजेच ३ जूनपासून ही दरवाढ लागू केली असून याचा परिणाम सामान्यांच्या खिशावर होणार आहे. या दरवाढीमध्ये अमूल गोल्ड, अमूल ताजा आणि अमूल शक्ती आदी उत्पादने आहेत. अमूल ताज नाना पाउच सोडून सर्व दुधाचे दर वाढविण्यात आले आहेत.
नव्या दरवाढीनुसार अमूल गोल्डच्या अर्धा लीटर दुधाची किंमत ३२ रुपयांवरून ३३ रुपये झाली आहे. अमूल ताजाची किंमत २६ रुपयांवरून २७ रुपये झाली आहे. अमूल शक्तीची किंमत २९ रुपयांवरून ३० रुपये झाली आहे. हे दर अहमदाबादमधील आहेत. महाराष्ट्रासह देशभरात या दरात बदल होऊ शकतात. अमूलने दरवाढ केल्यानंतर आता मदर डेअरी सारख्या कंपन्याही त्यांच्या दूध दरात वाढ करण्याची शक्यता आहे.
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |
मोबाईल चोरणारी अल्पवयीन टोळी जेरबंद |
सैदापूर येथून एकजण बेपत्ता |
सार्वजनिक बांधकाम विभागाला टाळे ठोकणार |
मुसळधार पावसामुळे सातार्यात दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ |