12:03pm | Feb 10, 2024 |
सातारा : स्व. भाऊसाहेब महाराज आणि लिंब गावचा फार मोठा जुना ऋणानुबंध आहे. येथील ग्रामस्थांनी आम्हाला भरभरून दिले तर, हे गाव मतदारसंघात असो वा नसो या गावच्या विकासासाठी आम्ही नेहमीच कटिबद्ध राहिलो. विकासकामे करताना लिंब गावाला नेहमीच झुकते माप दिले आहे. गावच्या विरोधात वेगळी भूमिका घेणाऱ्या अनेकांना ग्रामस्थांनी धडा शिकवला आहे. शेवटी जो विकासकामे करतो, लोकांचे प्रश्न मार्गी लावतो त्याच्याच पाठीशी उभे राहिले पाहिजे, असे प्रतिपादन आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.
लिंब ता. सातारा येथे आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या विशेष प्रयत्नातून आणि मार्गदर्शनाखाली पंतप्रधान आवास योजनेतून कातकरी समाजबांधवांना १५ घरांचे लोकार्पण, जल जीवन मिशन योजनेअंतर्गत लिंब गावासाठी १३.५० कोटींची पाणीपुरवठा योजना, त्यातील मुख्य पाण्याची टाकी आणि जलशुद्धीकरण केंद्राचे भूमिपूजन आणि १५ व्या वित्त आयोग आणि ग्रामनिधी यामधून ग्रामपंचायत सुसज्ज फर्निचर कार्यालयाचे उद्घाटन आ. शिवेंद्रसिंहराजेंच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी आ. शिवेंद्रसिंहराजे बोलत होते. यावेळी जेष्ठ नेते, अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन सर्जेराव सावंत, लिंबचे सरपंच ऍड. अनिल सोनमळे, लिंब सोसायटीचे चेअरमन प्रदीप पाटील, अजिंक्य विकास सेवा सोसायटी चेअरमन मारुती सावंत, भाजपचे तालुकाध्यक्ष महेश गाडे, पंचायत समितीच्या माजी सभापती सरिता इंदलकर, माजी उपसभापती दादा शेळके, राहुल शिंदे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
आ. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, गावचे युवानेते जितेंद्र सावंत हे आजारपणातून लवकर बरे होतील आणि समाजकारणात पुन्हा सक्रिय होतील, अशी कोटेश्वराकडे प्रार्थना करतो. गावातील युवा वर्ग एकसंघपणे गावच्या विकासासाठी कार्यरत आहे, हे पाहून आनंद वाटला. या गावच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कधीच कमी पडलो नाही. सातत्याने भरीव निधी उपलब्ध करून या गावातील प्रत्येक भागातील विविध प्रश्न सोडवले आहेत. यापुढेही लिंब गावच्या समस्या सोडविण्यासाठी कायम प्राधान्य राहील.
सरपंच सोनमळे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमास महादेव धोत्रे, धर्मेंद्र सावंत, बिपिन सावंत, गोव्याचे सरपंच विवेक जाधव, वरंगळचे सरपंच किरण साळुंखे, वर्येचे माजी सरपंच नवनाथ ननावरे, कुशीचे सरपंच जितेंद्र सावंत, कळंबे गावचे सरपंच एडवोकेट इंदलकर, बसाप्पाचीवाडीचे सरपंच सुनील शिंदे, धावडशी चे प्रभाकर पवार, किडगाव चे सुरेश टिळेकर, ज्ञानदेव सोनमळे गुरुजी यांच्यासह अनेक मान्यवर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |
मोबाईल चोरणारी अल्पवयीन टोळी जेरबंद |
सैदापूर येथून एकजण बेपत्ता |
सार्वजनिक बांधकाम विभागाला टाळे ठोकणार |
मुसळधार पावसामुळे सातार्यात दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ |