सातारा : फलटण तालुक्यातील वाठार निंबाळकर फाटा ते तडवळे आदर्की फाटा यादरम्यान सुरू असलेल्या रस्त्याच्या कामासंदर्भात शेतकऱ्यांना पूर्वसूचना न देता महसूल विभागाकडून भूसंपादनाची प्रक्रिया सुरू केली. ही बाब अन्यायकारक आहे. ही बाब जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी तात्काळ सातारा सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक आणि फलटण येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता यांना प्रत्यक्ष पाहणीचे आदेश दिले. त्यानुसार प्रत्यक्ष पाहणी शेतकऱ्यांच्या उपस्थितीत केली. यामध्ये बांधकाम विभागाचे अधीक्षक, ठेकेदार व भूमिअभिलेख विभागाच्या कामाच्या पध्दतीमध्ये विसंगती दिसून आली. दरम्यान, जिल्हा प्रशासनाने आता संबंधित ठेकेदार यांना तशा सूचना करुन शेतकऱ्यांवरील अन्याय दूर करावा, अन्यथा सोमवार, दि. ११ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन करण्यात येईल, यादरम्यान, कायदा व सुव्यवस्थेबाबत बांधकाम विभागाचे अधिकारी, कर्मचारी जबाबदार राहतील, असा इशारा शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष शंकर गोडसे व पदाधिकाऱ्यांनी दिला.
याबाबतचीे अधिक माहिती अशी, फलटण तालुक्यातील तडवळे, आदर्की फाटा ते हनुमंतवाडी तसेच वाठार निंबाळकर फाटा या दरम्यान रस्त्याचे काम सुरू करण्यात आले आहे. भूसंपादनाचे कोणतेही आदेश नसताना ठेकेदार यांनी काम सुरु केले आहे. याचवेळी कृषी पंपाच्या पाईपलाईनचे नुकसान झाले आहे. त्याची कोणतीही भरपाई तर नाहीच. याउलट संबंधित शेतकऱ्यांना ठेकेदार व लोणंद पोलीस स्टेशन या ठिकाणी बोलावून रस्त्याच्या कामाबाबत न्यायालयातून हरकत आदेश आणा अन्यथा आपणा विरुद्ध कारवाई केली जाईल असा दम दिला जात असल्याची बाब दोन दिवसांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास शेतकरी संघटनेने व शेतकऱ्यांनी आणून दिल्यानंतर जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशानुसार प्रत्यक्षात सातारा व फलटण येथील अभियंत्याने केलेल्या पाहणीमध्ये विसंगती असल्याबाबत शेतकऱ्यांबरोबर चर्चा केली. त्यामुळे ठेकेदाराची ही मनमानी व आमच्यावरील अन्यायकारक बाबी तात्काळ दूर करण्यासाठी गांभीर्याने घ्यावे, अन्यथा सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर अर्धनग्न मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा दिला.
या निवेदनाच्या प्रती जिल्हा पोलिस अधिक्षक, सार्वजनिक बांधकाम मंत्री, कार्यकारी अभियंता फलटण, लोणंद पोलिस स्टेशन यांना देण्यात आल्या.
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |
मोबाईल चोरणारी अल्पवयीन टोळी जेरबंद |
सैदापूर येथून एकजण बेपत्ता |
सार्वजनिक बांधकाम विभागाला टाळे ठोकणार |
मुसळधार पावसामुळे सातार्यात दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ |