सातारा : सालाबाद प्रमाणे परमपूज्य जगद्गुरु श्री शृंगेरी शारदा पिठाचे प्रमुख शंकराचार्य श्रीमद भारतीतीर्थ महास्वामी आणि श्री विधूशेखर भारती महास्वामी या दोघांच्या प्रेरणा व आशीर्वादाने सातारा येथील श्रीकृष्ण यजुर्वेद पाठशाळा येथे गुढीपाडवा ते रामनवमी दरम्यान नऊ दिवस श्रीराम महायज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे दिनांक 9 एप्रिल गुढीपाडवा ते बुधवार दिनांक 17 एप्रिल रामनवमी दरम्यान हा महायज्ञ संपन्न होणार आहे अशी माहिती या महायज्ञाचे संयोजक वेदमूर्ती विवेक शास्त्री गोडबोले यांनी दिली.
या रामयज्ञ सोहळ्यात गुढीपाडव्याला सकाळी आठ वाजता ब्रह्म ध्वजारोहण म्हणजेच गुढी उभारून शांतिसुक्त पठण, श्रीराम महायज्ञ प्रधान संकल्प, गणपती पूजन, पुण्याहवाचन, मातृकापूजन, नांदी श्राद्ध, आचार्य वरण, स्थलशुद्धीसाठी उदकशांत, श्रीराम पंचायतना सहित पिठस्त देवतांचे आवाहन पूजन, अग्नि मंथन, अग्नी स्थापना, नवग्रह यज्ञ व पुरुष सूक्त हवन होऊन श्री रामनामाचे हवन केले जाणार आहे. दुपारी चार ते साडेपाच या वेळेत भजन संपन्न होणार आहे. चैत्र शुद्ध द्वितीय ला बुधवारी 10 एप्रिल रोजी सकाळी आठ ते एक या वेळेत श्री सद्गुरु प्रित्यर्थ ब्रम्हा, विष्णू, महेश सूक्त स्वाहाकार व श्रीराम नामाचे हवन होणार असून दुपारी चार वाजता ब्रह्मचैतन्य अक्षय ओंकार भजनी मंडळाचे भजन संपन्न होणार आहे.
गुरुवार दिनांक 11 एप्रिल चैत्र शुद्ध तृतीयेला ब्रम्हा, विष्णू, महेश सूक्त स्वाहाकार व श्रीराम नामाचे हवन होणार असून दुपारी चार वाजता ब्रह्मचैतन्य अक्षय ओंकार भजनी मंडळाचे भजन संपन्न होणार आहे. दिनांक 11 एप्रिल चैत्र शुद्ध तृतीयेला सकाळी आठ ते एक या वेळेत श्री महालक्ष्मी प्रित्यर्थ श्रीसुकताचे हवन होऊन श्री रामनामाचे हवन होणार आहे. दुपारी चार वाजता विष्णू कृपा भजनी मंडळाचे भजन होणार आहे 12 एप्रिल शुक्रवारी श्री गणपती प्रित्यर्थ गणपती अथर्वशीर्ष स्वाहाकार व रामनामाचे हवन होऊन दुपारी चार वाजता दातेबाई भजनी मंडळाचा कार्यक्रम होणार आहे. शनिवारी पंचमीला 13 एप्रिल रोजी हनुमान देवता प्रित्यर्थ मन्यू सूक्त स्वाहाकार व श्रीराम नामाचे हवन होऊन दुपारी चार वाजता ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आरती मंडळाचे भजन संपन्न होणार आहे.
रविवारी 14 एप्रिल रोजी सूर्यनारायणाचे प्रित्यर्थ सकाळी आठ ते एक या वेळेत सौर सूक्त हवन होऊन श्रीरामान रामनामाचे हवन होणार आहे. सोमवारी 15 एप्रिल रोजी सकाळी आठ वाजता भवानी शंकर महारुद्र देवता प्रित्यर्थ लघुरुद्र स्वाहाकार व श्री राम नामाचे हवन होऊन दुपारी चार वाजता कल्याण भजनी मंडळाचे भजन होणार आहे. मंगळवार दिनांक 16 एप्रिल रोजी सकाळी आठ वाजता दुर्गा सप्तशती पाठ स्वाहाकार श्रीनाथ श्रीराम नाम हवन यज्ञांग भूत दांपत्य, कुमारीका, सुवासिनी पूजन होऊन दुपारी चार वाजता स्वानंद वरदविनायक भजनी मंडळाचे भजन होणार आहे.
श्रीराम नवमीला बुधवार दिनांक 17 एप्रिल रोजी सकाळी आठ ते एक या वेळेत शांतिसुक्त पठण आवाहन देवतांचे पूजन अग्नी ध्यान प्रभू श्री रामचंद्राचे प्रित्यर्थ पुरुष सूक्त स्वाहाकार श्री राम नाम हवन, उत्तरांग हवन बलिदान यज्ञाची पूर्णाहुती श्री राम जन्म काळाचे किर्तन गोवा येथील केशव बुवा शिवडेकर हे करणार आहेत.त्यानंतर सायंकाळी यज्ञस्थळापासून शोभायात्रा संपन्न होणार आहे. रामयज्ञ महाकाळात दररोज रात्री नऊ वाजता यज्ञस्थळी महाआरती होणार आहे. सांस्कृतिक कार्यक्रमांत चैत्रशुद्ध प्रतिपदा ते चैत्र शुद्ध अष्टमी म्हणजेच 9 एप्रिल ते 16 एप्रिल दरम्यान गोवा येथील केशवबुवा शिवडेकर यांचे सुश्राव्य कीर्तन होणार असून यावेळी त्यांना कोरेगावचे वैभव साने हे संवादिनीवर साथ करणारा असून तबला साथ मिलिंद देवरे करणार आहेत.
सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत गुढीपाडव्याला मंगळवारी दत्ता डोईफोडे आणि सहकारी यांचे राग एक रंग अनेक हा संगीत कार्यक्रम होणार आहे बुधवार दिनांक 10 एप्रिल रोजी सायंकाळी पावणे आठ वाजता पंडित संजय दीक्षित यांचे शास्त्रीय संगीत सादर होणार आहे. गुरुवार दिनांक 11 एप्रिल रोजी राष्ट्रीय कीर्तनकार हरिभक्त परायण मोरेश्वर बुवा जोशी चवलीकर पुणे यांचे शक्तिपात योग उपासना संप्रदाय या विषयावर प्रवचन होणार आहे. शुक्रवार दिनांक 12 एप्रिल रोजी त्रिवेणी संगीत विद्यालय नृत्य नाट्यम यांचा गीत रामायण व भरत नाट्य नृत्याचा अविष्कार सादर होणार आहे. शनिवार दिनांक 13 एप्रिल रोजी डॉ.प्रसाद देशमुख व डॉ. वृंदा देशमुख यांचे मधुमेह नियंत्रण आणि व्यवस्थापन या विषयावर व्याख्यान होणार आहे. रविवार दिनांक 14 एप्रिल रोजी ठाणे येथील पूर्णिमा पारखी यांची निसर्गातून शिकवण व श्री दत्तगुरूंचे 24 गुरू या विषयावर व्याख्यान होणार आहे. सोमवार दिनांक 15 एप्रिल रोजी सौ.विभावरी गोडबोले व सौ.प्राजक्ता भिडे यांचे श्री राम गुणगान संपन्न होऊन मंगळवार दि.16 एप्रिल रोजी श्रीराम सद्गुण गौरव समारोह आयोजित करण्यात आला आहे. अशी माहिती या महायज्ञाचे निमंत्रक व प्रमुख संयोजक वेदमूर्ती विवेक शास्त्री गोडबोले यांनी दिली. या राम यज्ञ सोहळ्यात आपण तनमन-धनाने सहभागी होऊन आनंद घ्यावा असे आवाहनही करण्यात आले आहे. राम यज्ञाच्या अधिक माहितीसाठी चिमणपुरा पेठ येथील श्रीकृष्ण यजुर्वेद पाठशाळा येथे संयोजकांशी संपर्क करावा.
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |
मोबाईल चोरणारी अल्पवयीन टोळी जेरबंद |
सैदापूर येथून एकजण बेपत्ता |
सार्वजनिक बांधकाम विभागाला टाळे ठोकणार |
मुसळधार पावसामुळे सातार्यात दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ |