05:00pm | Feb 22, 2024 |
सातारा : गेल्या सुमारे 20 दिवसांपासून श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज उर्फ दादामहाराज चषक डे-नाईट टेनिस बॉल क्रीकेट स्पर्धा मोठया उत्साहात छत्रपती शाहु स्टेडियमवर सुरु आहे. या स्पर्धेचा सेमी फायनल आणि फायनल मॅचेस शुक्रवार दिनांक 23/02/2024 रोजी संध्याकाळी होणार आहेत. फायनल मॅचचा थरार संपल्यावर, त्याचठिकाणी विजेता आणि उपविजेता संघाला लोकप्रिय खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या हस्ते पारितोषिकांचे वितरण मोठया उत्साहात होणार असून, त्याचवेळेस खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचा वाढदिवस, क्रीकेटप्रेमी आणि खेळाडुंच्या उपस्थितीत साजरा करण्यात येणार आहे अशी माहीती उदयनराजे मित्रसमुहाच्या वतीने प्रसिध्दीस दिली आहे.
गेल्या 17-18 वर्षापासून पश्चिम महाराष्ट्रातील लोकप्रिय ठरलेली डे-नाईट टेनिस बॉल क्रीकेट स्पर्धा खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन आयोजित करण्यात येत आहे. यास्पर्धेमध्ये प्रेषक देशातील व महाराष्ट्रातील नावाजलेल्या क्रीकेटपटुंची आतुरतेने वाट पहात असतात. यंदाचे वर्षी देखिल या स्पर्धेत ९२ संघांनी सहभाग घेतला असून, क्वार्टर फायनलच्या मॅचेस गुरुवारी होणार आहेत. या क्वार्टर फायनल मधील विजेते संघ सेमी फायनल आणि फायनला खेळणार आहेत. यामध्ये विजेत्या संघाला रुपये १,११,१११ आणि स्व.दादामहाराज चषक तसेच उपविजेता संघाला ६६,६६६ रोख पारितोषीक व चषक प्रदान करण्यात येणार आहेत तर उपांत्य फेरीपर्यंत धडक मारणा-या दोन संघाना प्रोत्साहनात्मक प्रत्येकी रोख रुपये २२,२२२ चे पारितोषीक प्रदान करण्यात येणार आहे.
या स्पर्धेच्या सेमी फायनल आणि फायनल मॅच पहाण्यासाठी तसेच त्यानंतर होणा-या बक्षिस समारंभास आणि खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी क्रीकेटप्रेमी नागरीकांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन स्पर्धेच्या संयोजक श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले मित्रसमुहाच्या वतीने अमोल पाटुकले यांनी केले आहे.
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |
मोबाईल चोरणारी अल्पवयीन टोळी जेरबंद |
सैदापूर येथून एकजण बेपत्ता |
सार्वजनिक बांधकाम विभागाला टाळे ठोकणार |
मुसळधार पावसामुळे सातार्यात दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ |