वडूज : नढवळ, ता. खटाव गावच्या हद्दीत येरळवाडी धरण क्षेत्रातून बेकायदा वाळू उपशावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या निमसोडच्या मंडलाधिकाऱ्यासह तलाठ्याला मारहाण करून जेसीबी अंगावर घालत खुनी हल्ला केल्याप्रकरणी वडूजच्या सात वाळू माफियांविरोधात वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
निमसोड विभागाचे मंडलाधिकारी शंकर चाटे (सध्या रा. वडूज, मूळ रा. खापरतोंड, ता. अंबाजोगाई, जि. बीड) यांनी फिर्याद दिली आहे. याप्रकरणी महेश नारायण गोडसे, हेमंत उर्फ (सोन्या कच्छी) राजेंद्र गोडसे, जेसीबी चालक, ट्रॅक्टर चालक व इतर तीन अनोळखी (सर्व रा. वडूज) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. यातील हेमंत गोडसे याला अटक करण्यात आली आहे.
याबाबतची माहिती अशी, येरळवाडी धरणाच्या नढवळ हद्दीत दि. 30 मार्च रोजी पहाटे महेश गोडसे हा त्याच्या हस्तकांमार्फत जेसीबी, ट्रॅक्टरच्या साहाय्याने वाळूचे बेकायदेशीर उत्खनन करून वाहतूक करत होता. तसेच अन्य संशयितही वाळू उपसा करत होते. त्यावेळी मंडलाधिकारी चाटे व तलाठी साळुंखे तेथे गेले असता हेमंत व अन्य अनोळखी इसमांनी हाताने व दगडाने तसेच लाथाबुक्क्यांनी चाटे यांना मारहाण केली. त्यानंतर संशयितांनी जीवे मारण्याच्या उद्देशाने जेसीबी अंगावर घातला. तेव्हा तलाठी साळुंखे यांनी चाटे यांना बाजूला ओढले. त्यानंतर चाटे हे जीव वाचवण्यासाठी पळून जात असताना वाळू माफियांनी चाटे यांच्या दिशेने पुन्हा दगडफेक केली. यात साळुंखे व चाटे जखमी झाले आहेत.
याप्रकरणी सर्व संशयितांविरोधात खुनाचा प्रयत्न व सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. घटनास्थळी खटावच्या पोलीस उपअधीक्षक अश्विनी शेंडगे यांनी भेट देऊन तपासाच्या सूचना केल्या. वडूजचे उपनिरीक्षक प्रमोद वाघ या गुन्ह्याचा तपास करत आहेत.
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |
मोबाईल चोरणारी अल्पवयीन टोळी जेरबंद |
सैदापूर येथून एकजण बेपत्ता |
सार्वजनिक बांधकाम विभागाला टाळे ठोकणार |
मुसळधार पावसामुळे सातार्यात दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ |