08:44pm | May 12, 2024 |
वाई : सातारा लोकसभा मतदारसंघाची ईव्हीएम मशिन ठेवलेल्या गोदामाच्या परिसरातील सीसीटीव्ही यंत्रणा दि १० पासून कोलमडल्याचे निदर्शनास आल्याने याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाने जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. यामुळे येथे एकच खळबळ उडाली. याची दखल घेत जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र डुडी यांनी ठेकेदारास कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. आज दिवसभर ही यंत्रणा सुरळीत करण्याचे काम सुरू होते.
सातारा लोकसभा मतदार संघासाठी ७ मे रोजी ६३.७ टक्के मतदान झाले. १८ लाख मतदारांपैकी ११ लाख मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. या निवडणुकीत १६ उमेदवार रिंगणात असून प्रमुख लढत भाजपचे उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात आहे. झालेल्या मतदानाच्या विधानसभा मतदारसंघ निहाय ईव्हीएम मशिन जिल्हा मार्केटिंग फेडरेशन एमआयडीसी सातारा येथील गोदामात सुरक्षित ठेवल्या आहेत. त्या मशिन्सच्या सुरक्षितेसाठी पोलीस यंत्रणेबरोबरच स्वतंत्र सीसीटीव्ही यंत्रणा आहेत. मात्र दि १० रोजी सकाळपासून सीसीटीव्ही यंत्रणा बंद असल्याची बाब राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार प्रतिनिधी राजकुमार पाटील यांच्या निदर्शनास आली. त्यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तक्रार केली असून त्यानुसार जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सीसीटीव्हीच्या ठेकेदारास कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
मतदान प्रक्रियेची सर्व ईव्हीएम मशिन्स या गोदामात सुरक्षित ठेवल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी माध्यमांच्या काही प्रतिनिधींना सांगितले होते. त्याच्या दुसऱ्या दिवशी प्रशासकीय यंत्रणेने त्याठिकाची तपासणी केली असता गोदामामध्ये संरक्षणासाठी पोलीस व स्वतंत्र सीसीटीव्ही यंत्रणा आहे. दरम्यान महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार शशिकांत शिंदे यांचे उमेदवार प्रतिनिधी राजकुमार पाटील यांनी सीसीटीव्ही यंत्रणा व त्याची लिंक दि. १० रोजी सकाळपासून वारंवार बंद दिसत असल्याची तक्रार निवडणूक आयोगाकडे केली. ईव्हीएम मशिनच्या संरक्षणासाठी बसवलेच्या सीसीटीव्हीची लिंक ही उमेदवार व त्यांच्या उमेदवार प्रतिनिधींना दिलेली आहे. ही लिंक दि. १० रोजीच्या सकाळपासून गोडावून परिसरातील सीसीटीव्ही कव्हरेज बंद दिसत आहे. त्याची तक्रार करण्यात आली. त्याच तक्रारीची दखल सातारचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी घेवून लगेच संबंधित ठेकेदारास कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. शनिवार दि. ११ रोजी दिवसभर त्याच तक्रारीच्या अनुषंगाने गोदाम परिसरात कार्यवाही सुरु होती.
जिल्हाधिकाऱ्यांनी सिद्धीविनायक सिक्युरिटी सिस्टिम लि. चे ठेकेदार मनेषकुमार गणेशलाल सारडा यास बजावलेल्या नोटीसीत म्हटले आहे की, गोदाम परिसरातील सीसीटीव्ही कव्हरेज दि. १० च्या सकाळपासून बंद दिसत असल्याने आपले लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगाने सीसीटीव्ही पुरवठा केलेले संपूर्ण देयक आपणास अदा करण्यात येणार नाही, याची नोंद घ्यावी. तसेच यंत्रणा तत्काळ कार्यान्वित न केल्यास आपणास काळया यादीत टाकले जाईल. आपली अनामत रक्कम जप्त केली जाईल, याची नोंद घ्यावी. तसेच मतमोजणी होईपर्यंत आपण स्वत: सदर ठिकाणी हजर रहावे. आपणाला गोदाम सोडून कोठे जायचे असल्यास जिल्हाधिकाऱ्यांची पूर्व परवानगी घेणे आवश्यक राहील. तरी जिल्हा मार्केटींग फेडरेशन गोदाम एमआयडीसी सातारा येथील सीसीटीव्ही यंत्रणा पूर्ण क्षमतेने योग्य रितीने चालू करण्याची कार्यवाही तत्काळ करण्यात यावी, अशा सुचना जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिल्या असून ही नोटीस दि. ११ मे रोजी दिलेली आहे.
ईव्हीएम मशिनवरुन सतत आरोप-प्रत्यारोप होत असताना व आंदोलने होत असताना ईव्हीएम मशिनमध्ये कोणताही फेरफार करता येत नाही. सुरक्षित मतदान करता येते असे निवडणूक आयोगाकडून प्रचार आणि प्रबोधन करण्यात आले होते. मात्र साताऱ्यातच येथील सीसीटीव्ही यंत्रणा बंद पडल्याने मतदारसंघात खळबळ उडाली आहे.
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |
मोबाईल चोरणारी अल्पवयीन टोळी जेरबंद |
सैदापूर येथून एकजण बेपत्ता |
सार्वजनिक बांधकाम विभागाला टाळे ठोकणार |
मुसळधार पावसामुळे सातार्यात दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ |