11:35am | Feb 10, 2024 |
सातारा : सज्जनगड येथील श्री राष्ट्रसंत समर्थ रामदास स्वामी यांच्या श्री समर्थ सेवा मंडळांचा पुणे येथील हा पादुकांचा प्रचार दौरा संपवून समर्थ पादुका पोवई नाका येथे या पादुकांचे समर्थ भक्त विद्याधर बुवा रामदासी व योगेशबुवा रामदासी यांच्या द्वारे आगमन झाल्यावर सातारा येथील वेदमूर्ती व न्यायशास्त्र अभ्यासक व संस्कृत भाषेचे जेष्ठ अध्यापक शंकरशास्त्री काशिनाथशास्त्री दामले यांचे शुभहस्ते पादुकांचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.
पादुकांचे स्वागत करण्यासाठी मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ.अच्युतराव गोडबोले व कार्यवाह समर्थ भक्त योगेश बुवा रामदासी यांचे सह रमेशबुवा शेंबेकर, प्रतिक रामदासी, वेदमूर्ती बोरीकर गुरुजी, अभिषेकबुवा दामले, बाळुबुवा कुलकर्णी रामदासी, समर्थ रामदास स्वामी भक्त मंडळाचे पदाधिकारी व मिरवणूक स्वागत समितीचे अध्यक्ष मोहन साठे, सचिव रामचंद्र नावलीकर, सहसचिव साहेबराव जांभळे तसेच समर्थ रामदास स्वामी भक्त मंडळाचे अध्यक्ष लक्ष्मण भंडारे, उपाध्यक्ष नारायण खरे, कार्याध्यक्ष आर.के.जाधव, सचिव अभय गोडबोले व खजिनदार मनोहर कुमठेकर व सर्व सदस्य भास्कर मेहेंदळे, अशोक गोडबोले, तात्या नावलिकर,रमण वेलणकर, राजाभाऊ कासट रवींद्र परांजपे ,केदार नाईक, सौ.लीना मेहेंदळे, सौ.कल्पना ताडे, समर्थ सदनचे व्यवस्थापक प्रवीण कुलकर्णी गुरुजी, राजू उर्फ मुरलीधर कुलकर्णी, गजानन बोबडे, बबनराव सापते, रवी बुवा आचार्य, संतोष वाघ, सौ.देसाई वहिनी, धनराज लाहोटी, लाहोटी परिवारातील सदस्य आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी.. जय जय रघुवीर समर्थ ,..जय भवानी, जय शिवाजी.. समर्थ रामदास स्वामी महाराज की जय..आदि जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता. पोवई नाका व्यापारी मंडळाच्या वतीने ही समर्थ पादुकांचे स्वागत करण्यात आले. रामदास स्वामींच्या आरतीनंतर शोभा यात्रा सूरू झाली.पादुकांचे स्वागत प्रसंगी मार्गावर भव्य रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या तसेच दरे बुद्रूक गावचे सांप्रदायिक भजनी मंडळाचे वारकरी पथक या मिरवणुकीची शोभा वाढवत होते.
पादुकांचे साताऱ्यात आगमन झाल्यावर पोवई नाक्यावरून मोठ्या समर्थ भक्तांच्या उपस्थितीत शहरातून मिरवणुकीला प्रारंभ झाला. यावेळी मिरवणुकीमध्ये प्रभू श्रीरामचंद्र सीता देवी व हनुमानच्या मूर्ती भव्यरथात फुलांच्या सजावटीमध्ये ठेवण्यात आल्या होत्या. हा भव्य मिरवणूक सोहळा पोवई नाका येथून मल्हार पेठ पोलीस मुख्यालयावरून शेटे चौक मार्गे देवी चौक, राजपथ, मोती चौक मार्गे राजवाडा येथून समर्थ सदन येथे मिरवणूक मार्गावरून पादुका जात असताना मार्गावरील व्यापारी बंधूंनी तसेच अनेक सातारकर नागरिकांनी पादुकांचे स्वागत केले तसेच महिलांनी पंचारतींनी औक्षण करून पुष्पवृष्टी केली.
दरम्यान समर्थ रामदास स्वामींच्या पादुका या समर्थ सदन येथे दिनांक 9 फेब्रुवारी ते 15 फेब्रुवारी दरम्यान सात दिवसाच्या वास्तव्यासाठी आहेत. यावेळी या रामभक्तांना समर्थांच्या पादुका आपल्या घरी नेऊन स्वहस्ते पाद्यपूजा करावयाची आहे त्यांनी समर्थ सदन येथे चौकशी करावी. तसेच सात दिवसाच्या या पादुका दौऱ्यामध्ये समर्थ सदन येथे दररोज सकाळी सहा ते सव्वा सहा या वेळेत काकड आरती, सव्वा सहा ते साडेसात यावेळेस समर्थ रामदास स्वामींच्या पादुकांची महापूजा व आरती सकाळी आठ ते बारा या वेळेत सातारा शहरातील विविध प्रभागात सांप्रदायिक भिक्षा फेरी तसेच दुपारी साडेतीन ते साडेचार या वेळेत स्थानिक मंडळांचा भजन कार्यक्रम होऊन सायंकाळी साडेचार ते साडेपाच या वेळेत करुणाष्टके व सवाया तसेच आरती होणार आहे. सात दिवस दिनांक 9 फेब्रुवारी ते 15 फेब्रुवारी दरम्यान सायंकाळी सहा ते साडेआठ या वेळेस समर्थ भक्त मकरंदबुवा रामदासी यांचे सुश्राव्य कीर्तन होणार आहे व रात्री नऊ वाजता शेजारती होणार आहे.
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |
मोबाईल चोरणारी अल्पवयीन टोळी जेरबंद |
सैदापूर येथून एकजण बेपत्ता |
सार्वजनिक बांधकाम विभागाला टाळे ठोकणार |
मुसळधार पावसामुळे सातार्यात दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ |