नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वातील ला स्पष्ट बहुमत मिळाले असून, आता सत्ता स्थापनेच्या हालचाली वाढल्या आहेत. दरम्यान, आज (दि.7) राजधानी दिल्लीत एनडीए ची बैठक पार पडली, यावेळी सर्व खासदारांच्या संमत्तीने नरेंद्र मोदी यांची संसदीय पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यात आली आहे. यावेळी विविध मित्रपक्षांच्या प्रमुखांनी नरेंद्र मोदींना पाठिंबा जाहीर केला. शिवसेनेकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील यांच्या नावाला संमती दर्शवली.
आज जुन्या संसद भवनात एनडीएच्या बैठकीत राजनाथ सिंह यांनी नरेंद्र मोदींना नेतेपदी निवडण्याचा प्रस्ताव मांडला. यावेळी हा प्रस्ताव एकमताने मंजूर करण्यात आला. प्रस्तावावेळी टीडीपीचे प्रमुख चंद्राबाबू नायडू आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, एकनाथ शिंदे, चिराग पासवान, पवन कल्याण यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, "आजचा ऐतिहासिक दिवस आहे. आज आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संसदीय दलाच्या नेतेपदी निवड करण्यात आली आहे. मी माझा पक्ष शिवसेनेतर्फे त्यांना पूर्ण पाठिंबा जाहीर करतो. गेल्या दहा वर्षात पंतप्रधानांनी या देशाचा विकास केला, देशाला पुढे नेले, जगात देशाचे नाव चमकावले, देशाची अर्थव्यवस्था मजबूत करुन नवीन ओळख मिळवून दिली. त्यामुळेच खोटे नरेटिव्ह पसरवणाऱ्या आणि जनतेची दिशाभूल करणाऱ्या विरोधकांना देशातील जनतेले नाकारले आणि तिसऱ्यांदा मोदींना स्वीकारले."
"मी शिवसेनेबद्दल इतकं सांगेन की, भाजप आणि शिवसेनेची विचारधारा एकच आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वात आमची युती झाली होती त्यामुळे ही युती फेविकॉलचा जोड आहे, कधीच तुटणार नाही. लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींनी प्रचंड मेहनत केली, त्यामुळेच देशाने सलग तिसऱ्यांदा त्यांची जादू पाहिली आहे. मी पंतप्रधानांसाठी एक कविता सादर करतो. 'मैं उस माटी का वृक्ष नहीं, जिसको नदियों ने सींचा है. बंजर माटी में पलकर मैंने मृत्यु से जीवन खिंचा है. मैं पत्थर पे लिखी इबारत हु , शीशे से कब तक तोड़ोगे. मिटने वाला मैं नाम नहीं, तुम मुझको कब तक रोकोगे..." अशा भावना एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केल्या.
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |
मोबाईल चोरणारी अल्पवयीन टोळी जेरबंद |
सैदापूर येथून एकजण बेपत्ता |
सार्वजनिक बांधकाम विभागाला टाळे ठोकणार |
मुसळधार पावसामुळे सातार्यात दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ |