12:27pm | May 11, 2024 |
सातारा : राज्यातील सर्व जनावरांना ईअर टॅगींग व त्याची भारत पशुधन प्रणालीवर नोंद बंधनकारक करणेबाबतचा कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग मंत्रालय मुंबई यांचा दिनांक २७ फेब्रुवारी रोजी शासन निर्णय निर्गमीत झाला आहे. शासन निर्णयानुसार भारत पशुधन प्रणालीवर पशुपालकांची सर्व माहिती मोबाईल नंबर, आधार नंबर तसेच पशुपालकाकडे असणारी जनावरांची माहिती जनावरांचे वय, लिंग, जात, मिल्कींग स्टेटस् इ. अदयावत करणे आवश्यक आहे. १ जून २०२४ पासून ईअर टॅगींग व भारत पशुधन प्रणालीवरील नोंदी शिवाय जनावरांची खरेदी विक्री करता येणार नाही. तसेच पशुवैदयकीय सेवा देय होणार नाही. केंद्र व राज्य शासनाकडून देय आर्थिक सहाय देय होणार नाही, नैसर्गिक आपत्ती, विजेचा धक्का तसेच वन्य पशुच्या हल्ल्यामुळे मृत्युमुखी पडलेल्या पशुधनास नुकसान भरपाईची रक्कम देय होणार नाही. राज्यातंर्गत जनावरांची वाहतुक करता येणार नाही. मालकी हस्तांतरण होणार नाही.
वरील सर्व बाबी टाळण्यासाठी सर्व पशुपालकांनी त्यांच्याकडील सर्व जनावरांना नजीकच्या पशुवैदयकीय दवाखान्याशी संपर्क साधून ईअर टॅगींग करुन घ्यावे व त्याच्या अचुक नोंदी भारत पशुधन प्रणालीवर तात्काळ करुन घ्याव्यात असे आवाहन डॉ. दिनक बोर्डे, जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त सातारा यांनी केले आहे.
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |
मोबाईल चोरणारी अल्पवयीन टोळी जेरबंद |
सैदापूर येथून एकजण बेपत्ता |
सार्वजनिक बांधकाम विभागाला टाळे ठोकणार |
मुसळधार पावसामुळे सातार्यात दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ |