09:42pm | Apr 01, 2024 |
सातारा : जिल्ह्यात काही प्रमाणात अवैध गौणखनिज उत्खनन सुरु होते. गत 7 ते आठ महिन्यांत 224 कारवाई करत त्यातून 9 कोटींचा दंड वसूल केला आहे. अवैध कामांवर कारवाई करण्याचे काम महसूल, पोलीस, जिल्हा परिषदेसह सर्वच प्रशासनाने सुरु केले आहे. कोणी अवैध कामे करत असेल तर त्यांनी तत्काळ बंद करावीत. अशा कामांवर कारवाई करत असताना कोणी गुंडागर्दी करत शासकीय अधिकारी, कर्मचार्यांस त्रास दिला तर सोडणार नाही, असा इशाराच जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी दिला.
जिल्हाधिकारी डूडी यांनी आज अवैध गौणखनिज कारवाईची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद घेतली. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी जीवन गलांडे, गौण खनिज अधिकारी थोरात आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डूडी म्हणाले, अवैध गौणखनिज उत्खनन, वाहतुकीवर महसूल प्रशासनाने कारवाई केली. 224 कारवाया करताना 100 वाहनांना दंड करत 9 कोटींचा महसूल वसूल केला आहे. यामुळे यंदा वर्षीचे 100 टक्के महसूल वसुली उद्दिष्ठ पूर्ण झाले आहे. सातारा जिल्ह्यात 234 क्रशर आहेत. त्यांची तपासणी केली असता 57 क्रशर अनधिकृत असल्याचे समोर आले. त्यातील काही कागदपत्रे घेवून रितसर सुरु ठेवले आहेत. उर्वरीत 43 अनधिकृत असून, ते बंद केले आहेत.
सातारा जिल्हा हा क्रांतीवीरांचा जिल्हा आहे. शांतताप्रिय जिल्हा आहे. येथे गुंडागर्दी चालणार नाही. चुकीच्या कामांवर प्रशासन कारवाई करेलच. महसूल, पोलीस, जिल्हा परिषद तसेच अन्य शासकीय यंत्रणा नियमाप्रमाणे कारवाई करत असतात. त्यांच्यावर कोणी गुंडागर्दी करण्याचा प्रयत्न केल्यास तर त्यांना सोडणार नाही. सर्व कायद्यानुसार त्यांच्यावर गुन्हे दाखल करुन कारवाई केली जाईल. कोठे चुकीचे काम सुरु असेल तर लोकांनी आमच्याशी संपर्क साधून माहिती द्यावी, असे आवाहनही जिल्हाधिकारी डूडी यांनी केले.
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |
मोबाईल चोरणारी अल्पवयीन टोळी जेरबंद |
सैदापूर येथून एकजण बेपत्ता |
सार्वजनिक बांधकाम विभागाला टाळे ठोकणार |
मुसळधार पावसामुळे सातार्यात दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ |