सातारा : सातारा लोकसभेसाठी भाजपच्या वतीने मी आहेच, असे सांगत खासदार उदयनराजे भोसले यांनी प्रचाराची पूर्णतः आखणी केली आहे. पहिल्या टप्प्यात प्रभागातील मतदार याद्या नुसार लोकांशी गाठीभेटी, त्यानंतर संपूर्ण जिल्ह्यामध्ये कार्यकर्त्यांशी संवाद आणि सातारा जिल्ह्यातील प्रमुख गावांमध्ये नागरिकांशी अनौपचारिक चर्चा अशा उपक्रमांवर उदयनराजे यांनी जोर देत मतदारसंघ पिंजून काढायला सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून मंगळवारी उदयनराजे भोसले यांनी कोरेगाव तालुक्यात जोरदार भिरकिट केली.
भारतीय जनता पार्टीच्या वतीने उमेदवारांच्या सात याद्या आत्तापर्यंत प्रसिद्ध झाल्या आहेत. मात्र अजूनही उदयनराजे भोसले यांच्या नावाची अधिकृत घोषणा झालेली नाही. मात्र तरीही पक्षश्रेष्ठींशी माझे बोलणे झाले आहे, असे ठामपणे विधान करत उदयनराजे भोसले आणि राजे समर्थक प्रचाराला लागले आहेत. महायुतीच्या मेळाव्यामध्ये उदयनराजे यांनी केवळ दहा मिनिटे हजेरी लावली. कराड दक्षिणचे नेते अतुलबाबा भोसले हे स्वतः उदयनराजे यांच्या गाडीचे सारथ्य करत त्यांना कार्यक्रम स्थळी घेऊन आले. महायुतीच्या उमेदवारासाठी सातारा, वाई, कराड या तीन ठिकाणी कार्यकर्ता मेळावा आयोजन करण्यात आले आहे. हा पक्षाचा अजेंडा झाला तरी उदयनराजे स्वतः निवडक कार्यकर्त्यांसह भिरकिट करू लागले असून त्यांनी मतदारसंघनिहाय गाव पिंजून काढायला सुरुवात केली आहे.
मागील दोन दिवसांमध्ये सातारा जिल्ह्यातील वेगवेगळ्या पक्षाचे कार्यकर्ते, नेते, जिल्हाध्यक्ष यांच्या गाठीभेटींवर उदयनराजे यांनी जोर दिला होता. उदयनराजे यांनी उन्हाची रखरख असतानाही त्याची तमा न बाळगता जनसंवाद कार्यक्रमावर जोर दिला आहे. महाविकास आघाडीच्या वतीने उदयनराजे यांच्या विरोधात आमदार शशिकांत शिंदे यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू असून सातारा लोकसभेला काट्याची टक्कर होईल, असा अंदाज आहे.
2019 च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीकडून निवडून येताना उदयनराजे भोसले यांना 5 लाख 32 हजार मते मिळाली होती. अर्थात ती सर्व राष्ट्रवादीची ताकद होती. मात्र राष्ट्रवादीचे दोन गटात विभाजन झाल्याने त्यांची राजकीय शक्ती क्षीण झाली आहे. सातारा जिल्ह्यात आता भाजपला उदयनराजे भोसले यांच्या मागे उमेदवारी निश्चित झाल्यानंतर पाठबळ उभे करावे लागणार आहे. सगळ्यात मोठी भिस्त वाईचे आमदार मकरंद पाटील यांच्यावर असणार आहे. महायुतीचा धर्म पाळावा, असे आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी मकरंद पाटील यांना केले आहे. याशिवाय कराड उत्तर व कराड दक्षिण व पाटण हे तीन मतदारसंघ लोकसभेच्या उमेदवाराला निर्णायक आघाडी देऊ शकतात, हे लक्षात घेऊन या तीन विधानसभा मतदारसंघांवर लक्ष केंद्रित करत खासदार उदयनराजे भोसले हे या मतदारसंघात जनसंवाद कार्यक्रमासाठी पोहोचणार आहेत. महायुतीच्या वतीने उमेदवारीच्या संदर्भात बोलताना भाजपचे नेते सावध भूमिका घेत असले तरी उदयनराजे यांनी आपला प्रचाराचा बाणा कायम ठेवत लोकसभेच्या रिंगणात मी आहेच, असे सांगत आपली कार्य व्यस्तता वाढवली आहे.
सातारा शहरात आणि हद्दवाढ क्षेत्रात एकूण एक लाख 81 हजार मतदान आहे. त्यासाठी सातारा विकास आघाडीची विशेष मोहीम उघडली असून सर्व नगरसेवकांना मतदार यादीनिहाय घरटी जनसंवाद साधण्याचे आवाहन उदयनराजे भोसले मित्र समूहाच्या वतीने करण्यात आले आहे. त्यानुसार नगरसेवक आपापल्या पद्धतीने जनसंवाद करत असून त्याचा फीडबॅक रोजच्या रोज घेतला जात असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |
मोबाईल चोरणारी अल्पवयीन टोळी जेरबंद |
सैदापूर येथून एकजण बेपत्ता |
सार्वजनिक बांधकाम विभागाला टाळे ठोकणार |
मुसळधार पावसामुळे सातार्यात दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ |