सातारा : सातारा येथील पोलीस अधीक्षक कार्यालयातील जिल्हा विशेष शाखेत कार्यरत असणारे पोलीस उपनिरीक्षक संभाजी सुदाम बनसोडे यांना त्यांच्या तीस वर्षाच्या गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल मुंबई येथे राज्यपालांच्या हस्ते राष्ट्रपती पदक देऊन गौरविण्यात आले.
संभाजी बनसोडे हे सातारा जिल्हा पोलीस दलात 1990 साली पोलीस शिपाई या पदावर भरती झाले. सध्या ते पोलीस उपनिरीक्षक या पदावर जिल्हा विशेष शाखेत कार्यरत आहेत. त्यांनी पोलीस मुख्यालय, जिल्हा विशेष शाखा, पाचगणी पोलीस ठाणे, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सातारा इत्यादी ठिकाणी उत्कृष्ट सेवा बजावली आहे. पोलीस दलात काम करीत असताना जिल्हा विशेष शाखा आणि लाचलुचपत विभागातील त्यांचे काम उल्लेखनीय ठरले आहे. आजपर्यंत त्यांच्या सेवा कालावधीत वेळोवेळी केलेल्या उल्लेखनीय कामगिरी करता त्यांना 380 बक्षिसे मिळालेली आहेत. त्यांच्या उल्लेखनीय कामकाजाबाबत त्यांना 2016साली पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांचे पोलीस पदक प्राप्त झाले असून आज पर्यंत त्यांनी 34 वर्षे उल्लेखनीय केलेल्या सेवेबद्दल 2022 मध्ये राष्ट्रपती यांच्याकडून गुणवत्तापूर्व सेवेचे पोलीस पदक देण्याचे जाहीर केले होते. हा समारंभ मुंबई येथील राजभवनात संपन्न झाला. तेथे राज्यपालांनी त्यांना राष्ट्रपतीपदक प्रदान केले. त्यांच्या या कामगिरीबद्दल त्यांचे पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल, पोलीस मुख्यालयाचे उपाधीक्षक सबनीस यांनी विशेष अभिनंदन केले आहे.
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |
मोबाईल चोरणारी अल्पवयीन टोळी जेरबंद |
सैदापूर येथून एकजण बेपत्ता |
सार्वजनिक बांधकाम विभागाला टाळे ठोकणार |
मुसळधार पावसामुळे सातार्यात दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ |