10:39pm | Feb 22, 2024 |
सातारा : सातारा जिल्ह्यातील विविध गुन्ह्यांमध्ये चोरीस गेलेले फिर्यादींचे दागिने आज एका कार्यक्रमामध्ये कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्या हस्ते फिर्यादींना हस्तांतरित करण्यात आले.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पोलीस अधीक्षक समीर शेख आणि अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा पोलीस दलातील स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाण्यांमधील अधिकारी, अंमलदार यांनी नोव्हेंबर 2022 पासून दरोडा, जबरी चोरी, घरफोडी, मोटरसायकल चोरी व इतर चोऱ्या असे एकूण 163 मालमत्तेचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. या गुन्ह्यांमधील चोरीस गेलेल्या सोन्याच्या दागिन्यांपैकी 442 तोळे सोने म्हणजेच 4 किलो 420 ग्रॅम असा एकूण 2 कोटी 70 लाख 80 हजार 700 रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे.
कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्या वार्षिक तपासणीचे औचित्य साधून पोलीस अधीक्षक समीर शेख आणि अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी फुलारी यांच्या हस्ते गुन्ह्यातील तक्रारदारांना सोन्या-चांदीचे दागिने परत करण्याचा कार्यक्रम आयोजित केला. या कार्यक्रमांमध्ये एकूण 4 किलो 420 ग्रॅम सोन्याचे दागिने तक्रारदारांना पुन्हा हस्तांतरित करण्यात आले आहेत. यावेळी तक्रारदारांनी सोन्या-चांदीचे दागिने परत मिळाल्याने समाधान व्यक्त करत सातारा जिल्हा पोलीस दलाच्या कामकाजाचे कौतुक करून सुनील फुलारी यांचे आभार मानले.
या कार्यक्रमास पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक आंचल दलाल, पोलीस उपअधीक्षक गृह अतुल सबनीस, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर तसेच सातारा जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व पोलिस अंमलदार उपस्थित होते.
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |
मोबाईल चोरणारी अल्पवयीन टोळी जेरबंद |
सैदापूर येथून एकजण बेपत्ता |
सार्वजनिक बांधकाम विभागाला टाळे ठोकणार |
मुसळधार पावसामुळे सातार्यात दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ |