08:59pm | Feb 08, 2024 |
सातारा : चित्रकलेचा विचार, चित्रकाराच्या मानसिकतेतून केला तर समोर असणार्या रित्या कॅनव्हास वर भरलेलं, कोंडलेलं, दबलेलं मन कॅनव्हास वर झोकून देऊन स्वतः निर्विकार होणे असते, असे उद्गार जेष्ठ चित्रकार अभिजीत शिंदे यांनी काढले.
साहित्य कला वर्तक (साकव) तर्फे दीपलक्ष्मी सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जेष्ठ रंगकर्मी तुषार भद्रे,सचिन प्रभुणे, बाबा भोरे, डॉक्टर राजश्री देशपांडे, ऍड. सीमांतिनी नुलकर, मुकुंद फडके यांनी अभिजीत शिंदे यांच्याबरोबर संवाद साधत चित्रकले संदर्भातील मूलभूत सिद्धांत बाबत चर्चा केली. मधुसूदन पत्की यांनी सूत्रनिवेदन केले.
अभिजीत शिंदे पुढे म्हणाले, प्रत्येक कलाकृतीत ताल, तोल आणि लय याचा अविष्कार पाहायला मिळतो. याचा प्ररमोच्चबिंदू म्हणजे गोल्डन रेशो असतो. ज्या बिंदूमध्ये ताल तोल आणि लय याचे नितांत सुंदर मिश्रण झालेले आपल्याला पाहायला मिळते. अर्थात हे चित्र पाहताना लहान मुलाच्या निर्भेळ मानसिकतेतून पाहिले. पाहिजे मन जेवढे ताजेतवाने, टटवीत, प्रसन्न आणि त्यावर कोणतेही पूर्वाश्रमीचे संस्कार नसतील तर त्या चित्राचा आस्वाद आपल्याला अधिक घेता येतो. चित्र पाहणे किंवा काढणे यासाठी आपण स्वतःशी प्रामाणिक राहणे अत्यंत महत्त्वाचे असते. विशेषतः चित्रकाराला प्रामाणिक राहून स्पष्टपणे जे आहे ते मांडणे अत्यंत गरजेचे आहे. त्यात विचार, अनुभव, संवेदना, भावभावना या सगळ्याचाच समुच्चय होत असतो. सृजनशीलते मध्ये बंडखोरी अनिवार्य असते. या बंडखोरीतूनच सर्जनशीलतेचा क्षण चित्रकाराला चित्र स्पष्ट करण्यास प्रेरणा देत असतो. यासाठी पूर्वग्रह बाजूला सारणे आवश्यक आहे. मळलेल्या पायवाटेवरून जाण्यापेक्षा स्वतःची पायवाट तयार करणे म्हणजेच शैली निर्माण करणे, हे अत्यंत महत्त्वाचे असते. अशा शैलीतून तयार केलेले चित्र म्हणजे निर्मितीचे समाधान होय. असेही शिंदे पुढे म्हणाले.
याप्रसंगी ज्येष्ठ चित्रकला शिक्षक तारू, सागर गायकवाड, प्राचार्य विजय धुमाळ आदी मान्यवर उपस्थित होते.
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |
मोबाईल चोरणारी अल्पवयीन टोळी जेरबंद |
सैदापूर येथून एकजण बेपत्ता |
सार्वजनिक बांधकाम विभागाला टाळे ठोकणार |
मुसळधार पावसामुळे सातार्यात दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ |