01:17pm | Feb 15, 2024 |
नवी दिल्ली : काँग्रेसचे राज्यसभा खासदार धीरज साहू पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये आयकर विभागाने धीरज साहू य़ांचं घर आणि अनेक ठिकाणांहून 350 कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त केली होती. आता धीरज साहू यांनी गेल्या वर्षभरातील रिटर्नमध्ये सुधारणा करून 150 कोटी रुपयांचा कर भरल्याची माहिती समोर आली आहे.
उद्योगपती आणि राजकारणी असलेल्या धीरज साहू यांनी आता असा युक्तिवाद केला आहे की, जप्त केलेली काही रोख रक्कम चालू आर्थिक वर्षात केलेल्या व्यवसायाशी संबंधित आहे, ज्याचे रिटर्न फक्त पुढील आर्थिक वर्षात भरायचे आहेत. उर्वरित 50 कोटींच्या रकमेबाबत कोणतीही ठोस माहिती नसल्याचं सूत्रांनी सांगितलं. यावर आयकर विभाग दंड आणि कर लावणार आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेस खासदार म्हणाले की, ही रोख रक्कम बिझनेस टर्नओव्हरचा भाग आहे. एकूण 50 कोटी रुपयांच्या रोख रकमेबाबत ते काहीही सांगू शकत नाहीत. त्यांना कर आणि दंड भरावा लागेल. आयकर नियमांच्या अंतर्गत, मूळ टॅक्स रिटर्नमध्ये कोणत्याही चुका किंवा गहाळ तपशील दुरुस्त करण्यासाठी रिटर्नमध्ये दुरुस्तीची परवानगी आहे.
डिसेंबरमध्ये धीरज साहूशी संबंधित असलेल्या अनेक ठिकाणांवर छापे टाकले होते. यामध्ये 351 कोटी रुपयांहून अधिक किमतीची रोख रक्कम आणि 2.8 कोटी रुपयांहून अधिक किमतीचे बेहिशेबी दागिने जप्त करण्यात आले आहेत. कारवाई पूर्ण झाल्यानंतर विभागाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, 329 कोटी रुपयांच्या रोख रकमेचा मोठा भाग ओडिशाच्या छोट्या शहरांमधून जप्त करण्यात आला आहे.
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |
मोबाईल चोरणारी अल्पवयीन टोळी जेरबंद |
सैदापूर येथून एकजण बेपत्ता |
सार्वजनिक बांधकाम विभागाला टाळे ठोकणार |
मुसळधार पावसामुळे सातार्यात दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ |