सातारा : किरकोळ कारणावरून अल्पवयीन मुलगा आणि त्याच्या आईस तिघांनी मारहाण केल्याची घटना आकाशवाणी केंद्राजवळ परिसरात घडली आहे. याप्रकरणी कमल संजय काळे वय 45 यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
आदिल खंदील शेख, गुलाब शेख, नेवा शेख सर्वजण राहणार आकाशवाणी केंद्राजवळ कब्रस्तान शेजारी या तिघांच्या विरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, नेवा शेख यांनी फिर्यादीचा बारा वर्षाचा मुलगा रोहन काळे याला पत्र्याच्या शेड वरील कापडी बॅनर सरळ करण्यास सांगितले व बदली पंधरा रुपये खाऊला देते, असे म्हणाले. रोहनने कापडी बॅनर सरळ बांधला. त्यावेळी त्याला पंधरा रुपये देण्यात आले. त्यानंतर संबंधिताने पत्र्याच्या शेडला असणारे आगी मोहोळ हाकलून लावायला सांगितले. तुला दहा रुपये देतो, असे म्हणाले. त्याप्रमाणे रोहन यांनी आगीमोहोळ सुद्धा तेथून हटवले. घराचा पत्रा वाजवून त्याने काम केल्याचे सांगितले. तेव्हा चिडलेल्या तिघांनी सारखे तुला कुठून पैसे द्यायचे, असे म्हणून रोहन काळे याला हाताने तोंडावर चापट मारली. तक्रारदार हिचा दुसरा नातू महेंद्र काळे हा भांडणे सोडवण्यात गेला असता त्याला सुद्धा मारहाण करण्यात आली. फिर्यादी संबंधितांना जाब विचारण्यासाठी गेल्या असता तुमच्या पोरांचे हातपाय तोडणार आहे, अशी दमदाटी करण्यात येऊन शिवीगाळ करण्यात आली. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक जगदाळे करत आहेत.
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |
मोबाईल चोरणारी अल्पवयीन टोळी जेरबंद |
सैदापूर येथून एकजण बेपत्ता |
सार्वजनिक बांधकाम विभागाला टाळे ठोकणार |
मुसळधार पावसामुळे सातार्यात दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ |