03:57pm | Feb 22, 2024 |
सातारा : समर्थांचे अधिष्ठान मानून समर्थांवर निष्ठा ठेवून श्री समर्थ सेवा मंडळ सज्जनगड ही संस्था १९५० सालापासून आत्तापर्यंत निःस्पृह भूमिकेतून समर्थ सेवेचे कार्य करत आहे. समर्थ विचारांचा प्रचार व प्रसार समर्थ भक्त रामदासी मंडळी निरपेक्ष हेतूने करीत आहेत. समर्थ सेवा मंडळाचे कार्य जनार्दनाला भावले व लोकांचा उदंड प्रतिसादापासून समर्थ सेवा मंडळाने भक्तांसाठी सेवा सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. निस्वार्थी मनाने चाललेल्या या कार्यास अनेकांचे योगदान कारणीभूत आहे. माघ वद्य प्रतिपदा ते माघ वद्य नवमी या दासनवमी उत्सवात समर्थ विचारांचे-जागरण होत असते या उत्सव काळात श्री समर्थ सदन सांस्कृतिक केंद्र, सातारा येथे समर्थ सेवा मंडळाचे वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
रवीवार दि. 25 फेब्रुवारी ते दि. 5 मार्च दरम्यान समर्थ सदन येथे दासबोध पारायण, प्रवचन, कीर्तन सेवा सादर केली जाणार आहे. दैनंदिन कार्यक्रमात रोज सकाळी साडेआठ ते अकरा या वेळेत समर्थ भक्त बाळकृष्ण बुवा रामदासी यांच्या वाचन मार्गदर्शनाखाली सामुदायिक दासबोध पारायण वाचन होणार आहे. तसेच सायंकाळी सहा ते आठ या वेळेत कीर्तन व प्रवचन सेवा आयोजित करण्यात आली आहे. या कार्यक्रमांमध्ये रविवार दि. 25 फेब्रुवारी रोजी समर्थ भक्त अभिषेकबुवा दामले रामदासी यांचे सुश्राव्य कीर्तन होणार आहे. सोमवार दि. 26 फेब्रुवारी रोजी समर्थ भक्त ध्रुवबुवा पटवर्धन यांचे किर्तन होणार असून मंगळवार दि. 27 फेब्रुवारी व बुधवार दि.28 फेब्रुवारी रोजी ह.भ.प.गौरी खांडेकर यांचे कीर्तन सादर होणार आहे. गुरुवार दि.29 फेब्रुवारी व शुक्रवार दि. 1 मार्च रोजी समर्थ भक्त प्रतीकबुवा रामदासी यांचे किर्तन सादर होणार आहे. शनिवार दि. 2 मार्च रोजी गौरी ठुसे यांचे कीर्तन सादर होणार आहे.
दि 3 मार्च व 4 मार्च रोजी समर्थ सेवा मंडळाचे अध्यक्ष समर्थभक्त श्री गुरुनाथ महाराज कोटणीस यांचे प्रवचन आयोजित करण्यात आले आहे. बुधवार माघ वद्य नवमी, दि. ५ मार्च रोजी श्री दासनवमी म्हणून साजरी होत आहे. या सर्व कीर्तन कार्यक्रमांना संवादिनीसाथ बाळासाहेब चव्हाण व तबलासाथ विश्वनाथ पुरोहित यांची राहणार आहे.
या सर्व कार्यक्रमांना समर्थ भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष गुरुनाथ महाराज कोटणीस, कार्याध्यक्ष डॉ.अच्युत गोडबोले, कार्यवाह समर्थ भक्त योगेश बुवा रामदासी यांनी केले आहे.
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |
मोबाईल चोरणारी अल्पवयीन टोळी जेरबंद |
सैदापूर येथून एकजण बेपत्ता |
सार्वजनिक बांधकाम विभागाला टाळे ठोकणार |
मुसळधार पावसामुळे सातार्यात दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ |