गडचिरोली : छत्तीसगड सीमेवरील कांकेरच्या जंगलात पोलिस व माओवाद्यांत २७ मार्च रोजी रात्री जोरदार चकमक उडाली. पोलिसांनी चोख प्रत्युत्तर दिल्यानंतर माओवाद्यांनी अंधाराचा फायदा घेत धूम ठोकली. घटनास्थळाहून मोठ्या प्रमाणात नक्षलीसाहित्य जप्त केले आहे. लोकसभा निवडणुकीच्या माओवाद्यांचे पोलिसांनी दुसऱ्यांदा मनसुबे उधळून लावले आहेत.
छत्तीसगडच्या औंधीसह एटापल्ली तालुक्यातील कसनसूर, धानोरा तालुक्यातील चातगाव दलमचे माओवादी महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवरील कांकेरच्या जंगलात तळ ठोकून आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घातपात घडवून आणण्याचा माओवाद्यांचा कट होता. पोलिसांना गोपनीय माहिती मिळाल्यावरुन पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी या भागात अपर अधीक्षक कुमार चिंता यांच्या नेतृत्वाखाली नक्षलविरोधी अभियान गतिमान केले. राज्य राखीव दलाच्या ८ तुकड्या, सी-६० चे जवान व एक शीघ्रकृती दलामार्फत परसिरात सर्च ऑपरेशन राबविले. यावेळी माओवाद्यांनी पोलिसांच्या दिशेने गोळीबार केला. पोलिसांनीही त्यांना प्रत्युत्तर दिले.
पोलिसांचा वाढता दबाव पाहून अखेर माओवाद्यांना माघार घ्यावी लागली. अंधाराचा फायदा घेत ते तेथून पळाले. घटनास्थळाहून वायर्स, जिलेटिनच्या काठ्या, बॅटऱ्या, सोलर पॅनल इत्यादी जप्त केले. या परिसरात नक्षलविरोधी अभियान अधिक गतिमान करण्यात आले आहे.
तीनवेळा पोलिस व माओवाद्यांत धूमश्चक्री :
२७ मार्चच्या रात्री तीनवेळा पोलिस व माओवाद्यांत धूमश्चक्री झाल्या. सुरुवातीला सायंकाळी ६ वाजता, त्यानंतर रात्री साडेनऊ वाजता व २८ रोजी पहाटे साडेचार वाजता चकमक उडाली. पोलिसांनी जशास तसे उत्तर दिल्याने माओवाद्यांनी नांगी टाकली. त्यांचा घातपाताचा डाव उधळून लावण्यात पोलिस यशस्वी झाले.
आठ दिवसांतील दुसरी घटना :
लोकसभा निवडणुकीत पोलिस दलाला नुकसान पोहोचविण्यासाठी माओवाद्यांच्या कुरापती सुरु आहेत. यापूर्वी १९ मार्चला पहाटे कोलामार्का जंगलाम माओवाद्यांनी पोलिसांवर गोळीबार केला होता. प्रत्युत्तरात पोलिसांनी गोळ्या झाडल्या, यात चार जहाल माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात पोलिसांना यश आले होते. त्यानंतर कांकेर जंगलातही चकमक उडाली.
महाराष्ट्रात पवार गट शून्य होणार |
सुरेल आवाजातील श्रीराम गीतांनी सातारकर मंत्रमुग्ध |
गुंडगिरी पोसणाऱ्यांना निवडणुकीत धडा शिकवा |
अमित शहा नसते तर सहकारी कारखाने बुडले असते |
कथीत थोर नेत्याकडून जनतेच्या हाती वाडगं |
खर्च निरीक्षक यांच्या उपस्थितीत झाली उमेदवारांची निवडणूक खर्चाची प्रथम तपासणी |
सातारा जिल्ह्यात सेंद्रीय शेतीला गती द्या : जिल्हाधिकारी डुडी |
आचारसंहितेचा भंग होत असल्यास 1950 क्रमांकावर संपर्क साधावा |
उदयनराजे भोसले यांचा मेंढोशी येथील मेळाव्यात विरोधकांना खोचक सल्ला |
घाणबी विभागात मोबाईल टॉवर उभारणार! |
पेठशिवापूर येथे निधी कमी पडू देणार नाही : उदयनराजे भोसले |
बेकायदा दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
संशयास्पद वस्तू जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
मधमाशांच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू |
एलसीबीच्या कोंबिंग ऑपरेशन मध्ये सातार्यात दोन पिस्टल जप्त |
खर्च निरीक्षक यांच्या उपस्थितीत झाली उमेदवारांची निवडणूक खर्चाची प्रथम तपासणी |
सातारा जिल्ह्यात सेंद्रीय शेतीला गती द्या : जिल्हाधिकारी डुडी |
आचारसंहितेचा भंग होत असल्यास 1950 क्रमांकावर संपर्क साधावा |
उदयनराजे भोसले यांचा मेंढोशी येथील मेळाव्यात विरोधकांना खोचक सल्ला |
घाणबी विभागात मोबाईल टॉवर उभारणार! |
पेठशिवापूर येथे निधी कमी पडू देणार नाही : उदयनराजे भोसले |
बेकायदा दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
संशयास्पद वस्तू जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
मधमाशांच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू |
एलसीबीच्या कोंबिंग ऑपरेशन मध्ये सातार्यात दोन पिस्टल जप्त |
जिल्ह्यातील दोन पोलीस अधिकार्यांसह 11 जणांना महासंचालक सन्मानचिन्ह |
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |