08:52pm | Apr 02, 2024 |
सातारा : सातारा जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे. या पार्श्वभूमीवर सातारा जिल्हा पोलिसांनी सुमारे 6050 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली असून परवानाप्राप्त 3228 अग्नीशस्त्रांपैकी 1962 अग्निशास्त्र पोलीस ठाण्यात जमा करून घेण्यात आली आहेत. जिल्ह्यात संवेदनशील 18 क्षेत्र असून प्रत्यक्ष 21 मार्गांवर पोलिसांनी रूट मार्च केल्याची माहिती पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी अतिरिक्त पोलिस अधीक्षक आचल दलाल व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर उपस्थित होते.
पोलीस अधीक्षक समीर शेख म्हणाले, सातारा जिल्ह्यामध्ये लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू आहे . या पार्श्वभूमीवर सातारा जिल्हा पोलीस दल पूर्णपणे सज्ज आहे. काही महत्त्वाच्या प्रक्रिया पोलिसांनी सुरू केल्या आहेत. 1397 फरार आरोपींपैकी 1342 आरोपींचा शोध सुरू आहे. पहिल्या टप्प्यामध्ये एकूण 55 आरोपींना शोधण्यात यश आले आहे.
2024 मध्ये 1097 अजामीन वॉरंट मंजूर असून 489 वॉरंट बजावण्यात आलेले आहेत. 492 वॉरंट बजावण्याचे काम सुरू आहे. मतदारांना दारू, पैसे, भेटवस्तू, इतर अनुषंगिक कारवायांच्या संदर्भात सातारा पोलीस कारवाई करत आहेत. यामध्ये 33 हजार 860 रुपयाची रोकड, 5 हजार 31 लिटर दारू जप्त करण्यात आली आहे. यासंदर्भात 24 लाख 88 हजार 51 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सातारा जिल्ह्यात आचारसंहितेचा पार्श्वभूमीवर 6050 लोकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. सातारा जिल्ह्यात आचारसंहिता भंगाची प्रकरणे हाताळण्यासाठी 35 भरारी पथके तैनात करण्यात आलेली आहेत. कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने 3228 परवाना प्राप्त अग्नीशस्त्रांपैकी 1962 अग्नीशस्त्र जमा करून घेण्यात आली आहेत.
सातारा जिल्ह्यातील 25 पोलीस ठाण्याच्या हद्दीत 18 संवेदनशील क्षेत्र आहेत. यामध्ये 21 मार्गांवर रूट मार्च करण्यात आला असून चार ठिकाणी फ्लॅग मार्च झाल्याचे त्यांनी सांगितले. सातारा जिल्ह्यात आतापर्यंत 24 कोंबिंग ऑपरेशन व दहा वेळा नाकाबंदी करण्यात आली आहे. सोशल मीडियावर नजर ठेवण्यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यामध्ये तीन पोलीस कर्मचाऱ्यांचे पथक तैनात ठेवण्यात आले आहे. तसेच सातारा जिल्ह्याच्या हद्दीवर 17 ठिकाणी चेक पोस्ट तयार करण्यात आले असून तेथे सीसीटीव्ही तैनात करण्यात आले आहेत. त्याशिवाय प्रत्यक्ष निवडणुकीच्या कामासाठी एक बीएसएफ, एक सीआरपीएफ तसेच एक होमगार्डची तुकडी ज्यादा तैनात करण्यात आल्याचेही समीर शेख यांनी सांगितले.
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |
मोबाईल चोरणारी अल्पवयीन टोळी जेरबंद |
सैदापूर येथून एकजण बेपत्ता |
सार्वजनिक बांधकाम विभागाला टाळे ठोकणार |
मुसळधार पावसामुळे सातार्यात दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ |