02:00pm | Feb 12, 2024 |
मुंबई : हेरगिरीचा आरोप करत कतारमधील न्यायालयाने भारताच्या आठ माजी नौदल अधिकाऱ्यांना फाशीची शिक्षा सुनावल्याने खळबळ उडाली होती. मात्र या प्रकरणामध्ये भारत सरकारच्या मुत्सद्देगिरीचा मोठा विजय झाला आहे. फाशीची शिक्षा सुनावलेल्या या आठही भारतीय माजी नौदल अधिकाऱ्यांची मुक्तता केली असून, त्यापैकी ७ जण मायदेशी परतले आहेत. दरम्यान, आता मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केंद्र सरकारचे अभिनंदन केले असून कुलभूषण जाधव यांचेही लवकरच भारताच्या भूमीवर आगमन होऊ दे, अशी मागणी केली आहे.
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी ट्विट करुन केंद्र सरकारचे अभिनंदन केले. ट्विटमध्ये म्हटले की, कतारमध्ये भारतीय नौदलाच्या ८ अधिकाऱ्यांना हेरगिरीच्या आरोपाखाली अटक करून फाशीची शिक्षा सुनावली होती. पण भारत सरकारच्या मुत्सद्देगिरीने त्या सर्व अधिकाऱ्यांची सुटका झाली, ह्याबद्दल सरकारचं अभिनंदन', आता अशीच मुत्सद्देगिरी कुलभूषण जाधव ह्यांच्याबाबत पण दिसू दे आणि लवकरच भारताच्या भूमीवर त्यांचं आगमन होऊ दे ही इच्छा !, अशी मागणीही ट्विटमध्ये केली आहे.
कतारने फाशीची शिक्षा सुनावलेल्या ८ माजी नौदल अधिकाऱ्यांची सुटका :
हेरगिरीचा आरोप करत कतारमधील न्यायालयाने भारताच्या आठ माजी नौदल अधिकाऱ्यांना फाशीची शिक्षा सुनावल्याने खळबळ उडाली होती. मात्र या प्रकरणामध्ये भारत सरकारच्या मुत्सद्देगिरीचा मोठा विजय झाला आहे. फाशीची शिक्षा सुनावलेल्या या आठही भारतीय माजी नौदल अधिकाऱ्यांची मुक्तता केली असून, त्यापैकी ७ जण मायदेशी परतले आहेत. याआधी या प्रकरणात भारताने कतारसोबत राजनैतिक पातळीवर चर्चा केल्यानंतर या आठ जणांना सुनावण्यात आलेली मृत्युदंडाची शिक्षा कमी करून कारावासाची शिक्षा सुनावली होती.
या आठ माजी नौदल अधिकाऱ्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आल्याने त्यांच्या नातेवाईकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं होतं. तसेच या अधिकाऱ्यांच्या कुटुंबीयांनी परराष्ट्र मंत्रालयाला विनंती केल्यानंतर सर्व राजनैतिक माध्यमांचा वापर करून त्यांना परत आणण्यासाठी कायदेशीर मदत केली जाईल, असं आश्वासन परराष्ट्र मंत्रालयानं दिलं होतं. दरम्यान, कतारमध्ये फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेल्या आठ अधिकाऱ्यांची सुटका झाली असून, त्यापैकी ७ जण मायदेशी परतल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे.
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |
मोबाईल चोरणारी अल्पवयीन टोळी जेरबंद |
सैदापूर येथून एकजण बेपत्ता |
सार्वजनिक बांधकाम विभागाला टाळे ठोकणार |
मुसळधार पावसामुळे सातार्यात दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ |